हॉटेल व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून शेतकऱ्यांना मदत करणारी ‘शेतकरी मैत्रीण सिमा पवार’

Update: 2020-08-12 07:26 GMT

सिमा पवार या पुण्यातील हॉटेल व्यवसायीक. पुण्यात दुर्वांकूर नावाने त्या हॉटेल चालवतात. केवळ स्वत:चीच नाही तर आपल्या सोबत शेतकऱ्यांचीही भरभराट व्हावी म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे.

याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, “आमच्या वर्षीक उत्पन्नातील पाच टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना देण्याचं आम्ही ठरवलं आहे. माझ्या मामांची शेती आहे. मी त्यांना खुप जवळून पाहिलंय. नैसर्गीक आपत्ती, बियाण्यांच्या वाढत्या किमती, या सगळ्याचा त्यांना खुप त्रास होत असतो. मी त्यांनी मेहनत बघितलेय. पण असे अनेक शेतकरी असतील त्यांचं काय? अशांना आपण मदत केली पाहिजे या हेतूने मी हा व्हवसाय सुरु केला.” असं त्या सांगतात.

पाहा ‘शेतकरी मैत्रीण सिमा पवार’ यांची पुर्ण कहाणी...

https://youtu.be/piMUHHwAmCw

Similar News