ये Pawri वाली लडकी बहोत फेमस हो रही है

“ये हमारी कार है, ये हम है, और ये हमारी पॉरी हो रही है” ये Pawri वाली लडकी बहोत फेमस हो रही है

Update: 2021-02-16 13:15 GMT

सोशल मीडियावर कोण कधी स्टार सांगता येत नाही फक्त तुमच्याकडे व्हायरल होणारा कंटेंट पाहिजे असं म्हटलं जातं. सध्या अशाच एका सोशल मीडिया स्टारची चर्चा होतेय ती म्हणजे पाकिस्तानच्या दानानीर मोबीनची. आता ही पाकिस्तानची दानानीर कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही "ये हमारी कार है, और ये हमारी पॉरी हो रही है" व्हिडीओवाली आहे.

पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत दानानीर सांगीतलं की, "आम्ही पार्टी करत होतो. पार्टीची एक आठवण म्हणून मी व्हिडीओ काढला आणि तो खुप व्हायरल झाला."

कोण आहे दानानीर?

19 वर्षीय दानानीर मोबीन पाकिस्तानच्या पेशावर येथे राहते. दानानीरने कंटेंट क्रियेटर, मेकप आर्टीस्ट, फॅशन गुरु म्हणून आपले इंस्टाग्राम बायोमध्ये म्हटलं आहे. तसंच ति मानसिक आरोग्याविषयी देखील व्हिडीओ बनवत असते.

आता दानानीरच्या "ये हमारी कार है, और ये हमारी पॉरी हो रही है" या व्हिडीओवर बर्याेच मीम बनवल्या जात आहेत. या व्हायरल व्हिडीओच्या वाहत्या गंगेत PIB फॅक्ट चेक, पार्लेजी आणि उत्तर प्रदेश पोलीसांनी देखील हात धुवून घेतले आहेत.

या व्हायरल व्हिडीओवर PIB Fact Check ने मीम बनवत 'ये हमारा नंबर है, ये हम है, और यहा पर फेक न्युज बुस्ट हो रहे है"

तर उत्तर प्रदेश पोलीसांनी शेअर केलेल्या मीममध्ये त्यांनी "ये हम है, ये हमारी कार है, और लेट नाईट पॉरी आपको परेशान कर रही है तो ये हमारा है" असं म्हटलं आहे.

पार्लेजी ने शेअर केलेल्या मीममध्ये त्यांनी "ये पार्लेजी है, ये चाय है, और ये हमारी पॉरी हो रही है" असं म्हटलं आहे.

एवढ्यावरच न थांबता दानानीरने आता "ये हमारी पॉरी हो रही है" लिहीलेली टीशर्ट देखील आणली आहेत. याबाबत तिने ट्वीटरवर माहिती दिली आहे.

पण लोकहो जर तुम्ही दानानीरचा फक्त पॉरी वाला व्हिडीओ बनवून तिची खिल्ली उडवत असाल तर ती चूक ठरु शकते कारण दानानीरने कोरोना काळात ज्या मजुरांचे हाल झाले त्यांच्यासाठी मदतीचं आवाहन करणारे व्हिडीओही बनवले आहेत.

एवढच नाही तर ती स्वत:सुध्दा एका सामासेवी संस्थेसोबत काम करते

Tags:    

Similar News