कार्यालयात जाण्यापूर्वी 'सरप्राईज व्हीजिट'; या महिला IPS ची होतेय चर्चा

Update: 2021-01-18 04:30 GMT

मुंबई: राज्यातील पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडून शहरात सुरू असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी 'सरप्राईज व्हीजिट' चर्चेचा विषय बनला आहे. तर अमरावतीकरांकडून त्याचं कौतुक होत आहे.

अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून चैन स्नैचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चैन स्नैचिंगसाठी आरोपी वापरत असलेल्या वाहनांना नंबर प्लेट नसल्याचं सुद्धा समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांकडून ठीक-ठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. मात्र असे असतानाही नमुना भागात चैन स्नैचिंगची घटना समोर आली होती.

त्यामुळे आता पोलीस आयुक्त आरती सिंह स्वतः या मंगळसूत्र चोरांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच नाकाबंदीच्या ठिकाणी त्या नियमितपणे 'सरप्राईज व्हीजिट' देत असल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चोकपणे कामगिरी बजावत आहे.

रोज सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी सिंह ह्या कोणत्या-कोणत्या नाकाबंदीच्या ठिकाणी हमखास 'सरप्राईज व्हीजिट' देत आहे. त्यांच्या या 'सरप्राईज व्हीजिट'मुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साहा वाढत असून शिस्तही दिसून येत आहे. तर पोलीस आयुक्तांच्या या कामगिरीमुळे शहरातील नागरिकांकडूनही त्यांचं कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.



Tags:    

Similar News