विजय मल्ल्या भारतात परतणार?

Update: 2020-05-15 04:30 GMT

भारतातील बँकांचे सुमारे 11 हजार कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये फरार झालेल्या विजय मल्ल्याला ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. मल्ल्याने भारतात प्रत्यार्पण करण्यास आव्हान देणारी याचिका ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता (Mallya) विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ब्रिटनच्या कनिष्ठ कोर्टानं मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिल्यानंतर मल्ल्याने या निर्णयाला ब्रिटनच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. पण तिथे मल्ल्याच्या पदरी निराशा पडली होती. अखेरचा प्रयत्न म्हणून विजय मल्ल्याने हायकोर्टाच्या या निर्णयाला ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. दरम्यान या निर्णयाआधी विजय मल्ल्याने भारत सरकारला विनंती करणारे एक ट्विट केले आहे.

हे ही वाचा

‘त्या’ पोलिस कन्येनं दिली पंकजा मुंडेंना नवी चेतना

AatmaNirbharBharat : शेतकरी आणि मजूरांसाठी ‘या’ आहेत मोठ्या घोषणा

आपण बँकांचे 100 टक्के कर्ज परत करण्यास तयार आहोत, पण सरकारने आपल्याविरुद्धच्या सर्व केसेस मागे घ्याव्यात अशी विनंती त्याने केली आहे.

 

“सरकारने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत सरकारचे अभिनंदन. त्यांनी हवी तेवढ्या नोटांची छपाई करावी पण माझ्यासारखा छोटा वर्गणीदार देशातील बँकांचे 100 टक्के कर्ज फेडण्यास तयार असताना त्याच्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे? कृपया कोणत्याही अटीशिवाय माझा पैसा घ्या आणि हे मिटवा ” असे ट्विट विजय मल्ल्याने केले आहे.

आता भारतात येणे टाळण्यासाठी विजय मल्ल्याकडे फक्त युरोपीय मानवाधिकार कोर्टाचा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्याने जर या कोर्टात अपील केले नाही तर पुढच्या 28 दिवसात मल्ल्याचे भारताला प्रत्यार्पण शक्य आहे.

Similar News