Home > ‘त्या’ पोलिस कन्येनं दिली पंकजा मुंडेंना नवी चेतना

‘त्या’ पोलिस कन्येनं दिली पंकजा मुंडेंना नवी चेतना

‘त्या’ पोलिस कन्येनं दिली पंकजा मुंडेंना नवी चेतना
X

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी डावलल्यामुळे चर्चेत होत्या. परंतु आज त्यांनी एक असा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे त्यांना खुप ताकद आणि चेतना मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपुर्वी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विधानपरिषदेवर जाण्यासाठी अग्रणी होत. मात्र भाजपने चार नवीन चेहऱ्यांना संधी देत राजकीय वातावरण ढवळून काढलं होत. त्यानंतर अपेक्षाभंग झालेल्या पंकजा बऱ्याच दिवसानंतर व्यक्त झाल्या आहेत.

हे ही वाचा...

महाराष्ट्राच्या राजकारणात जनाधार असलेल्या नेत्यांपैकी पंकजा मुंडे याही एक आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे य़ांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनीही राजकीय वर्तुळात स्वत:भोवती जनसामान्यांचं वलय निर्माण केलं. राज्याभरात त्यांचे कार्यकर्ते सक्रीय आहेत.

पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कार्यकर्ती नाही पण चाहती नक्कीच असू शकते. भायखळा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार मांचेकर यांची मुलगी मानसी मांचेकर या मुलीने पंकजा मुंडे यांचं एक छानसं चित्र रेखाटलं आहे. मानसीचा चित्र रेखाटतानाचा फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केला आहे.

Updated : 14 May 2020 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top