मुंबईतील कोव्हीड रुग्णालयात ३०० गरोदर महिलांची सुखरुप प्रसुती

Update: 2020-06-14 14:29 GMT

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाने 'कोरोनाबाधीत गरोदर महिलांच्या सुखरुप ३०० प्रसूतींचा (300 successful deliveries) टप्पा पार केला आहे. रविवारी सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात १४ एप्रिलला पहिल्या कोविड बाधित महिलेची सुखरूप प्रसूती झाली होती.

त्यानंतर गेल्या २ महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोविड बाधीत मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. एकाच रुग्णालयात ३०० (300 successful deliveries) कोविड बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण असल्याचा दावा हॉस्पिटल प्रशासनाने केला आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

पाकिस्तानातील आणखी एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

गेले दोन महिने सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सीमा चव्हाण, रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे ७५ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Similar News