Home > Sports > पाकिस्तानातील आणखी एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

पाकिस्तानातील आणखी एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह

पाकिस्तानातील आणखी एक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह
X

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. शाहिद आफ्रिदी याने स्वतः ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे. गुरुवारपासून आपली तब्येत बरी नव्हती तसंच प्रचंड अंगदुखी असल्याने चाचणी केल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे शाहिद आफ्रिदी याने सांगितले आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

बाल मजुरी ही प्रथा इतिहासजमा करूयात

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही त्याने आपल्या चाहत्यांना केले आहे. तौफीक उमर आणि झफर सरफराज या दोन क्रिकेटपटूंनंतर शाहिद आफ्रिदी हा पाकिस्तानचा तिसरा क्रिकेटपटू आहे ज्याला कोरोनाची बाधा झाली आहे.

Updated : 13 Jun 2020 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top