बलात्कारामागची मानसिकता समजून घ्या, तरच उपाय करता येतील...

Update: 2020-11-06 11:13 GMT

नुकतीच उत्तरप्रदेश हातरस मधील बलात्काराची घटना अख्या देशात चर्चेत आली. या घटनेमुळे स्त्रीयांवरील हिंसाचार, बलात्कारचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला. देशात आणि महाराष्ट्रात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. उदा. 15 वर्षापुर्वी महाराष्ट्रात घडलेलं खैरलांजी बलात्कारातील दलित हत्याकांड, दिल्लीत निर्भया, अहमदनगर मधील कोपर्डी असे गेल्या 15 वर्षातील भयंकर गाजलेली हत्याकांड मी पाहीली आहेत. ऐकली आहेत. मग आजही हे अत्याचार का घडत आहेत?

1. जातियतेतुन बलात्कार

स्त्री वर होणारे बलात्कार हे मादी म्हणून जरी होत असले जातियतेतुन बलात्कार होण्याचे प्रकार जास्त आहे. अशा बलात्कारातील आरोपीच्या शिक्षेत फरक उदा. आरोपी दलित कुंटुबातील आणि स्त्री उच्चवर्णीय असेल तर आरोपीच्या बाबतीत एक तर जाग्यावर एनकाऊटंर किंवा न्यायालयात सुद्धा लवकर शिक्षा आणि आरोपी उच्चवर्णीय आणि स्त्री दलित असेल तर एफआयआर नोंदणी पासून मँनेजमेंट सिस्टिम कामाला लागलेली असते.. न्यायालयात सुद्धा तारीख पे तारीख अशी यंत्रणा. हे झालं आरोपीच्या बाबतीत.

2. पिडीतेबाबत होणारा भेदभाव

पीडित महिला जर उच्चवर्णीय असेल तर तिचा एफआयआर जसा आहे तसा, तिला वैद्यकीय मदत तातडीची आणि व्हिआयपी दर्जाच्या ट्रिटमेंटसाठी विमानाने बाहेर देशात उपचाराची सोय केली जाते. त्यामानाने दलित स्त्री असेल तर गुन्ह्यातील कलमे कमी करत बोथट एफआयआर नोंद करणे (अमरावतीमधील बलात्कार प्रकरणात अँट्रासिटी कलम नंतर अँड केले) वैद्यकीय तपासणीत दिरंगाई, उपचार व्हिआयपी न देणे असे अनेक प्रकारचे भेदभाव दिसून येतात.

याचाच अर्थ इथं स्त्री च्या वेदनेवरून नाही जातिवरुन बलात्काराची तिव्रता ठरवली जाते. तसं पाहीलं तर सर्वच स्त्रिया या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत शुद्र आहेत. परंतु उच्चवर्णीय स्त्रिया आणि दलित स्त्रिया यांचे प्रश्न त्यांची दाहकता यात ही फार फरक आहे. कारण येथील पुरषप्रधान व्यवस्थेने कायमच स्त्रियांना दुय्यम मानलय. आणि ही पुरूषप्रधानता सर्व जाती धर्माच्या पुरूषांमध्ये आढळतेकारण ही पुरूषप्रधानता ब्राम्हणीव्यवस्थतेतुन खालच्या अगदी आंबेडकरी चळवळीतील पुरूषांमध्ये आढळते.

समता, समानता आणि न्याय ही लोकशाही संविधानातील मुल्ये इथल्या व्यवस्थेने पायंदळी तुडवली आहेत. समान संधीचा समान लाभ आणि समान परिणाम याप्रमाणे स्त्रियांचा विकास होताना दिसुन येत नाही. प्रतिकात्मक प्रगती नेहमी पुढे आणली जातेय अशी प्रतिकात्मक प्रगती नाही तर प्रत्यक्षात प्रगती व्हावी.

देशात पुरुषप्रधान व्यवस्था असल्याने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी. 'महिला नामधारी आणि पुरूष कारभारी' असल्याने मोठ्या प्रमाणावर महिलांना निर्णय घेऊ दिले जात नाहीत. याचाच परिणाम गावातील, घरातील, शेजारी होणाऱ्या महिला अत्याचारांवर बोलताना आणि कृती करताना महिला कमी दिसतात. महिलांचा मोर्चात, आंदोलनात रस्त्यावर स्टेजच्या पेंडाल मध्ये गर्दी जमवण्यासाठी वापर भोगवस्तुम्हणून आजही वापर केला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पुढे जाऊन विचार केला तर असं आढळून येते की, उच्चवर्णीय पुरुष ज्यांच्याकडे सत्ता संपत्ती मोठ्या प्रमाणावर एकवटली आहे अशांना जातियता पित्रुसत्ता दिसुन येत नाही. दलित पुरुषांना जातियता दिसते पण पुरुषप्रधानता दिसत नाही. उच्चवर्णीय स्त्रियांना पित्रुसत्ता दिसते पण जातियता दिसत नाही. त्यामानाने दलित स्त्रियांना जातियता आणि पित्रसत्ता हे दोन्हीही समजतं आणि जातियतेमुळे आणि पित्रसत्तेमुळे होणारे अत्याचार ही समजतात.

3. दारू

मोठमोठ्या बलात्काराच्या घटनांमध्ये दारू हा घटक कारणात किंवा घटनेच्या पुराव्यात सापडताना आपल्याला दिसुन येतो. महिला हिंसाचार हे पुरूषप्रधानतेमुळे होतात हे दुरगामी कारण जरी असले तरी गुन्ह्यांचं तात्कालिक कारण दारू हेच समोर येताना दिसतं. आज तरूण पोरं मोठ्या प्रमाणावर दारूच्या आहारी जात आहेत. आणि हे व्यसन फँशन म्हणुन करता करता स्त्री अत्याचार करण्याचं एक शास्त्र बनलं आहे असं म्हणता येईल.


सत्यभामा सौदरमल, सामाजीक कार्यकर्त्या


Tags:    

Similar News