पत्रकारितेचं वेड काय असतं जरूर पहा..

Update: 2023-05-19 02:06 GMT

गेली ३२ वर्ष पत्रकारितेत अनुभव असणाऱ्या राही भिडे यांनी आपल्या सुरुवातीच्या काळातील पत्रकारिता आणि महिलांचे स्थान यावर भाष्य केलं आहे, राजकीय विश्लेषणाबरोबरच महिला पत्रकारांनी राजकीय माहिती घेणं आणि राजकीय पत्रकारितेत येणं गरजेचं असल्याचं त्या नेहमी म्हणतात पण महिलांनी पत्रकारिता या क्षेत्रात करिअर करणं सोपं आहे का? एक महिला राजकीय पत्रकार म्हणून काम करत असताना कोण-कोणत्या अडचणी येतात? काळजी करू नका.., या सगळ्याविषयी तुमच्या मनात ज्या काही शंका आहे त्या सर्व शंका दूर होतील कारण MaxWoman Conclave मध्ये ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी त्यांचा संपूर्ण पत्रकारितेचा अनुभव कथित केला आहे.. त्यांचा हा अनुभव ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या किंवा पत्रकारितेविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी ही माहिती शेवटपर्यंत वाचा...

वेवेवेगळ्या क्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या महिलांचा MaxWoman आयोजित आणि MahaChai प्रस्तूत MaxWoman Conclave मध्ये सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार राही भिडे या प्रमुख अथिति होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या सुरवातीपासून ते आजपर्यंत त्या कशा घडल्या हा संपूर्ण जीवनप्रवास सांगितला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी 32 वर्षे राजकीय पत्रकारिता करीत आहे. या प्रवासात अनेक अनुभव आले. मात्र या सगळ्याचं मूळ बालपणी शाळेत बातम्या वाचून दाखवण्यात आहे. तर नक्की काय होतं त्यांच्या शाळेत? तर त्यांना शाळेत असताना प्रार्थना झाल्यानंतर सर्वांना दोन बातम्या वाचून दाखवाव्या लागत. यामध्ये मग सगळ्या बातम्या या महाराष्ट्रातील इतर ठिकाणी घडलेल्या असायच्या व त्या सर्वजण वाचून दाखवत. यामध्ये प्रामुख्याने खून, मारामारी, दरोडे अशाच बातम्या असायच्या. असं सगळं असताना स्थानिक बातम्या नसायच्या, स्थानिक बातम्या नाहीत आणि असतील तर त्या कोण वाचत नाही याचं त्यांना खूप खेद वाटतं होतं. एके दिवशी राही भिडे यांच्या घराजवळच एका गोठ्याला आग लागली आणि त्या गोठ्यात असणाऱ्या एका रेडकाला त्याच्या झळा बसल्या. हे राही भिडे यांना समजल्यानंतर वेळ काय न बघता त्या त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी त्याचं वार्तांकन केलं. अगदी शाळेत असल्यापासूनच पत्रकारितेविषयी त्यांची असलेली ही ओढ होती. त्यांनी मध्यरात्री जागून लिहिलेली ही बातमी दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये आल्यानंतर त्यांनी तीच बातमी शाळेत वाचून दाखवली. म्हणजे एखादं काम करत असताना आपल्याला त्या कामाविषयी आत्मीयता असणं गरजेचं असतं आणि जर आत्मीयता असेल तर ते काम करण्यासाठी वेळ काळ याचं कोणतंही बंधन राहत नाही.

शालेय जीवनात असताना राही भिडे यांना आपण काहीतरी लिहिलं पाहिजे असं सतत वाटत होतं. मराठा वृत्तपत्र त्यांच्या घरी येत होतं, त्यावेळी त्यांना सातत्याने वाटायचं की या वृत्तपत्रात जसं लिहिलं जातं तसं आपल्याला का लिहिता येणार नाही? आणि याच भावनेतून त्यांनी प्रयत्न केला आणि पहिला एक लेख लिहिला. बुद्ध पौर्णिमेला त्यांनी मराठा साठी एक लेख पाठवला. हा लेख बौद्ध भिक्कूनी यांच्याबद्दल लिहिला होता. आणि विशेष म्हणजे मराठाने तो लेख छापला. दोन नंबर पानावरती तो लेख छापून आला आणि त्यानंतर त्यांना एक वेगळंच प्रोत्साहन मिळालं. त्याचवेळी त्यांनी ठरवून टाकलं की आपलं पुढचं प्रोफेशन हेच असणार आहे. त्यानंतर राही भिडे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती free press journal या इंग्रजी वृत्तपत्रात युथ कॉलम लिहिण्यापासून. free press journal मध्ये काम करत असताना सुद्धा तिथलं कल्चर कसं होतं? त्या तिथे कशाप्रकारे जॉईन झाल्या? हे सगळं अत्यंत रंजक आहे. अशा प्रकारे इथून सुरु झालेला राही भिडे यांचा पत्रकारितेतील प्रवास आजही सुरु आहे. गेल्या ३४ वर्षांपासून त्या राजकीय पत्रकारिता करत आहेत. अगदी शाळेतून सुरु झालेला हा त्यांचा प्रवास अनेक नामांकित वृत्तपत्रांच्या संपादक पदापर्यंतचा आहे. या सगळ्या प्रवासात त्यांना अनेक छोटे मोठे अनुभव आले आहेत. यामध्ये अनेक राजकीय रंजक अनुभव देखील त्यांनी यावेळी शेअर केले आहेत. तुम्हाला जर हे संपूर्ण जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही MahaChai प्रस्तुत MaxWoman Conclave नक्की पहा...

Full View


संपूर्ण कार्यक्रमाचे विडिओ येथे पाहा ... 


Full View

Tags:    

Similar News