#InternationalDayOfYoga : योगासनाची काही आसने व त्याचे फायदे नक्की वाचा..

Update: 2022-06-21 02:21 GMT

आज जागतिक योग दिन आहे. योग केल्याने व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकते. अशी अनेक योगासने आहेत जी घरात किंवा बाहेर सहज करता येतात.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार हा १२ आसनांचा समूह आहे, जे केल्याने तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम होतो. कोणत्याही वयोगटातील लोक हे करू शकतात. हे लक्षात ठेवले पाहिजे की जर हर्निया किंवा तुम्हाला अन्य काहो समस्या असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल अथवा कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर हे योग आसन करू नये. सूर्यनमस्कारासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ.

आता घरी करता येतील अशी काही आसने आपण पाहुयात..

त्रिकोनासन

हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे ज्याचे अनेक फायदे आहेत. त्रिकोनासनाच्या रोजच्या सरावाने खांदे, पाठ, कंबर मजबूत होते. गुडघेदुखी कमी करते.

वृक्षासन

नावाप्रमाणेच, झाडासारखे आसन. या योगासनांचा शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे सकारात्मक परिणाम होतो. मनाला केंद्रीत करते. मज्जासंस्था संतुलित करते. पायाला बळ देते. तणाव दूर होतो. हा व्यायाम 30 सेकंद ते एक मिनिटापर्यंत केला जाऊ शकतो.

भुजंगासन

ते घरी सहज करता येते. पोटाचा आकार कमी करायचा असो किंवा पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. त्यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात. छातीचे स्नायू ताणले जातात. थायरॉईडच्या रुग्णांनी हे आसन अवश्य करावे. रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. लक्षात ठेवा.

अनुलोम-विलोम प्राणायाम

प्रत्येकजण ते करू शकतो. उजवी नाकपुडी ही सूर्य नाडी आणि डाव्या नाकपुडी ही चंद्र असं म्हंटल जातं. हा प्राणायाम करण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. थोडा वेळ दाबून ठेवा, नंतर डाव्या नाकपुडी बंद करा आणि उजव्या बाजूने श्वास सोडा. पुन्हा उजवीकडे श्वास घ्या, थोडा वेळ धरा, डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा. अशा प्रकारे ही क्रिया 15 ते 20 वेळा करा.

तुम्हाला काही आजार असतील तर या बाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Tags:    

Similar News