आता आम्हाला सरकारचे तमाशे बघायचे नाहीत- रुपाली पाटील
X
३१ मे राजी लॉकाडाऊनचा चौथा टप्पा संपणार आहे. अद्यापही कोरोनाच्या संकटावर मात करण्यात यश आलेलं दिसत नाही. त्यामुळे पुढील काळात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता अधिक आहे. या काळात वाढत्या लॉकडाऊनबरोबर प्रशासकीय सुविधा कशा वाढवणार याचही उत्तर आता सरकारने द्यायला हवं अशी मागणी मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी ‘मॅक्सवूमन’च्या माध्यामातून केली आहे.
हे ही वाचा..
- ‘जातीधर्माची भांडणं आम्हाला नकोयत’, रुपाली पाटील यांचा मोदींवर निशाणा
- भाजप आपल्या पापांनीच मरत आहे, रुपाली पाटील यांचा आक्रमक टोला
- ‘तर तुमचे सगळे व्हिडीओ बाहेर येतील’, दानवेंना जावयाची धमकी
“जेवढा काळ आम्हाला काढायचा होता तेवढा काळ आम्ही घरात काढलेला आहे. सर्वसामान्यांचं राशन संपलेलं आहे. पैसैही संपले आहेत. रोजगारावरुन काढण्यात आलं आहे. आम्हाला मान्य आहे की, आमचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही लॉकडाऊन वाढवत आहात पण कोरोना नाही गेला तर उपासमारीने आम्ही मरणार आहोत.” अशी भावना रुपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या संकटकाळातील राजकीय वादावर बोलताना रुपाली पाटील यांनी आक्रमक भुमिका घेताना “आता आम्हाला तुमचे तमाशे बघायचे नाही. तुमची नौंटकी बघायची नाही. केंद्र आणि राज्य सरकारला तसचं विरोधकांनाही हेच सांगणं आहे. आता कोणीही सत्तेतून बाहेर जात नाही. जे सत्तेवर आहे त्य़ांना काम करु द्या आणि विरोधकांनी सहकार्य करुन आपल्या लोकांपर्यंत मदत पोहचते का हे पाहावं.”
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/1604923513000708/?t=438