तबलीगी जमात समुदायविरोधी वक्तव्यावरुन भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट (Babita Fogat) हिला आता बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी ओळख असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिने चांगलंच धारेवर धरलं आहे. सर्व देशवासीयांना एक करणं हा आपली जबाबदारी आहे. देशाला विभक्त करणं आणि आग लावणं हे आपलं काम नाही. सोबतच चक्क बबिता तुमचं आडनाव फोकट आहे म्हणून फोकटचे सल्ले देऊ नका अशीही तंबी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे.
संबंधित बातम्या..
- तबलीगी जमातने देशात कोरोनाचं संक्रमण केलं नसत तर..; बबिता फोगट
- कुस्तीपटू बबिता फोगट यांचा भाजपात प्रवेश
- मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना- ज्वाला गुट्टा
“अशी महिला जी देशाचं नाव रोशन करते ती देशाला बर्बाद कसं करु शकते. मला विश्वास होत नाही की बबिता फोगट यांनी असं वक्तव्य केलं आहे. भारतातील प्रत्येक मुसलमान देशावर प्रेम करतो त्यामुळे तुम्ही देशात लढाई लावण्याचं काम करु नका. काही लोक जे वाईट आहेत त्यांच्यामुळे सर्व मुसलमानांना दोषी ठरवू नका.“ अशी भावना राखी सावंतने आपल्या बहुचर्चित शैलीत व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
बबिता फोगाटने तबलिगी जमातीबद्दल आक्षेपार्ह टीका केलेल्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर वाद पेटला होता. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर बबिताला ट्रोल केलं गेलं. आपल्या ट्वीट वरील ट्रोलींगलाही उत्तर देताना बबिता फोगटने एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तीने मी काही जायरा वसीम नाही की लोकांना घाबरुन घरात बसून राहीन. मी आपल्या वक्तव्यावर ठाम असून कोणाच्याही धमक्या, टीकांना घाबरुन माझं मत बदलणार नाही असं म्हटलं होतं. पुढे तीने तबलीगी जमातीची संख्या खरंच जास्त नाही का? तबलीगी जमात वाल्यांनी कोरोनाचं संक्रमण केलं नसतं तर आतापर्यंत लॉकडाऊनही संपलं असतं असा आरोप बबिताने या व्हिडीओतून केला होता.
यदि आप बबीता फोगाट को सपोर्ट करते हैं तो उन तक यह बात जरूर पहुंचा दीजिए और उनको बोलिए ध्यान से कान खोल कर सुन लें। pic.twitter.com/gqec3lQwPE
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 17, 2020