Home > तबलीगी जमातने देशात कोरोनाचं संक्रमण केलं नसत तर.. - बबिता फोगट

तबलीगी जमातने देशात कोरोनाचं संक्रमण केलं नसत तर.. - बबिता फोगट

तबलीगी जमातने देशात कोरोनाचं संक्रमण केलं नसत तर.. - बबिता फोगट
X

नुकतंच कगंणा रणावतची बहिण रंगोली चंदेल हिचं ट्वीटरवरील प्रक्षोभक वक्तव्यांचा शेवट झाला. ट्वीटर ने तीचं अकाऊंट सस्पेंड केल्यानंतर या प्रकरणाला पुर्णविराम मिळाला आहे. त्यांनंतर आता प्रसिद्ध कुस्तीपटू बबिता फोगाटने तबलिगी जमातीबद्दल आक्षेपार्ह टीका केलेल्या ट्वीटमुळे पुन्हा वाद पेटला आहे. या ट्वीटनंतर सोशल मीडियावर बबिताला ट्रोल केलं जातंय.

Babita Fogat controvercial statement Tabligi jamat Courtesy : Social Media

गतवर्षी १२ ऑगस्ट रोजी बबिताने भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. वडील महावीर फोगाट यांनीही पक्षात प्रवेश केला होता. यांनंतर हरयाणा पोलिसमधील सब इन्सपेक्टर पदाचा राजीनामा देत बबिताने निवडणुक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

आपल्या ट्वीट वरील ट्रोलींगलाही उत्तर देताना बबिता फोगटने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात तीने मी काही जायरा वसीम नाही की लोकांना घाबरुन घरात बसून राहीन. मी आपल्या वक्तव्यावर ठाम असून कोणाच्याही धमक्या, टीकांना घाबरुन माझं मत बदलणार नाही असं म्हटलं आहे. पुढे तीने तबलीगी जमातीची संख्या खरंच जास्त नाही का? तबलीगी जमात वाल्यांनी कोरोनाचं संक्रमण केलं नसतं तर आतापर्यंत लॉकडाऊनही संपलं असतं असा आरोप बबिताने या व्हिडीओतून केलाय.

दिल्लीतील मरकजच्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचा आरोप होत असताना काही दिवसांपूर्वी बबिताने तबलिगी जमातबद्दल अपशब्द वापरुन एक ट्विट केले होते. त्या ट्विटनंतर बबितावर जोरदार टीका झाली आणि तिने ते ट्विट डिलीट केले होते.

India Wrestler Babita Fogat Courtesy : Social media

या ट्विटनंतर प्रशांत कनोजिया या व्यक्तीने तिला ट्विटरवर उत्तर देत, “एका मुस्लिमाने सिनेमा बनवून प्रसिद्धी मिळवून दिली, नाहीतर या देशात क्रिकेटर सोडले तर इतर खेळाडू काही वर्षांनंतर पाणीपुरी विकताना आढळतात.” अशी टीका केली.

पण कनोजिया यांच्या या ट्विटला बबिताने उत्तर दिले आहे. “ एक सिनेमा तुमच्यावरही बनवून घ्या आणि त्या सिनेमाचे नाव पत्थरबाजों की गँग असे ठेवले पाहिजे”, असे बबिताने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशात सध्या कोरोनाचं संकट असताना अफवा परसवणे किंवा समाजमाध्यमांमधून प्रक्षोभक किंवा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये असे आवाहन केले जात असताना बबिताने केलेल्या ट्विटवरुन वाद निर्माण झाला आहे. आता बबितावर कारवाई होणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 17 April 2020 1:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top