Home > उद्धव ठाकरेंकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरेंकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे

उद्धव ठाकरेंकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहतोय- सुप्रिया सुळे
X

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यामातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यातील एकूण परिस्थितीची शेती, व्यवसाय, रोजगार, शिक्षण, राज्य सरकारची भुमिका याविषयी आपली मत व्यक्त केली. आजच्या घडीला महाराष्ट्राकडे सर्वाधिक कोरोनाबाधितांची हॉटस्पॉट म्हणून पाहिलं जात असलं तरी लवकरच य़ा सर्व परिस्थितीवर मात करुन पुन्हा अग्रेसर येऊ अशी भावना व्यक्त केली.

हे ही वाचा..

कोरोनाच्या संकटात सरकारच्या एकूण कामगिरीविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या कामाचं कौतुक केलं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व मंत्री हे आज उत्तम काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे अवघा महाराष्ट्र मोठा भाऊ म्हणून पाहत आहे,” असा अनुभव त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून व्यक्त केला.

राज्यातील गुटखाबंदीची अंमलबजावणी करताना सरकारला आलेल्या अपयशाची कबुली देताना रस्त्यांवर थुंकण्याच्या सवयीविषयी मोहम राबवणं आवश्यक आहे. कोरोनामुळे लोकांच्या थुंकण्याच्या घातक सवयीकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधलं. सोबतच नागरिकांनी ही मोहीम राबवण्यासाठी कल्पना सुचवाव्यात अशी विनंती केली.

गरोदर महीला आणि लहान मुलं असलेल्या महिलांना तपासणी, बाळंतपणासाठी अडचणी निर्माण होत आहेत. बऱ्याच ठिकाणी आई आणि लहान मुलं वेगवेगळ्या ठिकाणी असल्यांच्या घटना समोर येत आहेत. अशा प्रकरणात पोलिसांनी सहकार्य करावं असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं.

कॉलेजमधील विद्यार्थ्य़ांच्या परिक्षांविषयी बोलताना 10 मे पर्यंत शासनाकडून स्पष्टता देण्यात येईल. विद्यांर्थ्यांसाठी ही वेळ म्हणजे वोनस आहे. या काळात त्यांनी अधिक अभ्यास करावा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

Updated : 28 April 2020 7:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top