Home > ठाकरेंचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर प्रियांका गांधींचे भाजपला खडे बोल

ठाकरेंचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर प्रियांका गांधींचे भाजपला खडे बोल

ठाकरेंचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नांवर प्रियांका गांधींचे भाजपला खडे बोल
X

कोरोनाच्या संकटात राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पेटलेले वाद सतत उघड्यावर येत आहे. देशातील एकुण रुग्णांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या फारच चिंताजनक आहे. सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झटत असताना भाजप राजकारण करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केला आहे. भाजपने महाराष्ट्र सरकारकडे पाहून कोरोनाशी लढा कसा द्यावा हे शिकण्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

हे ही वाचा..

काही दिवसांपुर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेलं असताना भाजपने सर्व राजकीय डावपेच वापरुन सरकारला अडचणीत आणण्याची संधी सोडली नव्हती. यावर “महाराष्ट्र सरकारकडे पाहा. महाराष्ट्रात महामारीचं भयंकर रुप आहे आणि सरकार लढत आहे पण तुम्ही त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांचं सरकार पाडण्य़ाचं काम करत आहात.” असे खडे बोल प्रियांका गांधी यांनी भाजपला सुनावले.

एकुणच देशभरात राजकीय गतीविधींचं केंद्र आता महाराष्ट्रात आहे. गेल्या काही महिन्यांपासून यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राज्यातील घडामोडींवर असून बऱ्याच प्रकरणांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यातून उद्धव ठाकरेंपेक्षा योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) कसे उत्तमप्रकारे सरकार हाताळतात हे दर्शवलं जातय.

कोरोना विषाणूचं संकट डोक्यावर असतानाही राजकीय हेवेदावे काही केल्या कमी होत नाहीत. आम्ही राजकारण करत नाही असं म्हणत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत कलगीतुरा रंगताना दिसत आहे. देशातील जनतेसमोर अनेक गंभीर प्रश्न असून ते प्रश्न राजकीय सहकार्यातून सोडवले जाण्याची आवश्यकता आहे.

Updated : 29 May 2020 3:36 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top