Home > व्हिडीओ > Video: अमरावतीच्या खासदारांनी 'या' कारणामुळे कापले आमदाराचे केस

Video: अमरावतीच्या खासदारांनी 'या' कारणामुळे कापले आमदाराचे केस

Video: अमरावतीच्या खासदारांनी या कारणामुळे कापले आमदाराचे केस
X

लॉकडाऊनमुळे सर्वच दुकान बंद आहेत. त्यात केशकर्तनाची दुकानही बंद असल्याने घरबसल्या पुरुषांची केस आणि दाढी वाढवत आहेत. कुठेच जायचं नाही तर मग तयार व्हायचा ताण तरी का घ्या म्हणत सगळे निवांत आहेत. अनेकांनी तर कधी नव्हे ते दाढी वाढवण्याची संधी साधली आहे.

अशीच काही तऱ्हा नेतेमंडळींच्या घरची पण आहे. या आमदार साहेब केस कापत नाहीत म्हणून खुद्द खासदारांनीच त्यांचे केस घरातच कापलेत. काळजी करु नका रागाच्या भरात नाही कापले. तर या आमदाराने मिटींगला जाताना व्यवस्थित जावं म्हणून हे केस कापले आणि इथं आमदार-खासदार एकाच घरातले आहेत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आमदार पती रवी राणा (MLA Ravi Rana) यांचे केस कापले आहेत. आत्मनिर्भर बननेका अनोखा प्रयास, लॉकडाउन में सांसद पत्नी ने काटे विधायक पति के बाल। असं म्हणत त्यांनी आपला हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केलाय.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/268616807715535/?t=1

Updated : 29 May 2020 11:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top