Home > माझा संवाद अमित शाह आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी- पंकजा मुंडे

माझा संवाद अमित शाह आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी- पंकजा मुंडे

माझा संवाद अमित शाह आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी- पंकजा मुंडे
X

विधानपरिषदेतील संधी नाकारली गेल्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यापुर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. “पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला संधी मिळू शकते असं सांगुन तयारी करण्यास सांगितले परंतू तसं झालं नाही याचं वाईट वाटलं. पण ज्यांना संधी मिळाली त्यांना मी शुभेच्छाही दिल्या होत्या.” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

हे ही वाचा...

भाजपमधील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सर्व चर्चांना पुर्णविराम देत "माझा जन्म भाजपात झालाय. त्यामुळे हा पक्ष मी जवळून पाहिलाय. पंकजा मुंडे लोकांशी बोलत नाहीत असं कोणी कितीही म्हणाले तरी, आपण सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही हे खरेही आहे, पण कोरोना संपल्यानंतर मी सर्वांपर्यंत पोहोचेन" असं म्हणत त्य़ांनी समर्थकांना पुन्हा नव्याने उभं राहण्याचं आवाहन केलंय.

पक्षातील त्यांच्या स्थानाविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझा संवाद अमित शाह (Amit Shah) यांच्याशी आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी माझं बोलणं आहे. असं स्पष्ट केलं. “विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सगळे म्हणतात, ताई शांत का आहेत? पण शांततेच निर्णय घेता येतात. भविष्याचा वेध घेता येतो” असं म्हणत त्यांनी राज्यातील ज्येष्ठ भाजप नेत्यांना इशारा तर दिला नाही ना? हे येत्या काळातच समजू शकेल.

Updated : 4 Jun 2020 1:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top