श्रमिक रेल्वेतून हरवलेली ‘ती’ मुकबधीर महिला सुखरुप घरी परतली
X
कोरोनाच्या संकटात अमरावती जिल्ह्यामधून एक सुखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिक आपल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशीच एक प्रवासी महिला मुंबईहून निघालेल्या श्रमिक ट्रेनमधून चुकून अमरावती मध्ये उतरली होती. महिला मुकबधिर असल्यामुळे त्यांच्या विषयी जाणून घेणं आणि त्यांची मदत करणं फारचं अवघड झालं होतं.
मात्र, या सर्व अडचणींवर मात करत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर आणि प्रशासनाला चुकलेल्या महिलेस घरी पाठवण्यात यश मिळालं आहे.
मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणा-या महिलेचा आधार प्रणालीचा वापर करुन तिचा मूळ पत्ता शोधून काढला गेला. पत्ता मिळाल्यानंतर तिला स्वतंत्र वाहनाने तिच्या स्वगृही साडीचोळी देऊन निरोप दिला. महिलेचे नाव के. मंजुळा असून ती आंध्र प्रदेशातील रहिवासी आहे तिला निरोप देताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वजण भारावून गेले होते.
https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/634118237180884/?t=0