Home > ‘पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत आमदाराची मजल गेली तरीही सरकार गप्प’

‘पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत आमदाराची मजल गेली तरीही सरकार गप्प’

‘पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत आमदाराची मजल गेली तरीही सरकार गप्प’
X

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शालीनी शर्मा (Shalini Sharma) यांच्याशी बोलताना अपमानास्पद शब्दांचा वापर करणारे समाजवादी पार्टीचे नेते अबु आझमी (Abu Azmi) यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शर्मा यांची चेंबूर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी सत्ताधारी आमदाराच्या हट्टापायी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यावर तीव्र विरोध दर्शवला आहे.

हे ही वाचा..

मजुरांना परराज्यात जाणाऱ्या रेल्वेंची योग्य माहिती का मिळाली नाही? म्हणून अबु आझमी यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यावेळी संतापलेल्या अबु आझमी यांनी त्यांच्या 30 कार्यकर्त्यांसह रस्त्यावर निदर्शनं केलं. निदर्शनादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी शालीनी शर्मा यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

अबु आजमी यांच्यासह झालेल्या वादामुळे शालीनी शर्मा यांची बदली करण्यावरुन चित्रा वाघ यांनी खंत व्यक्त केली आहे. ‘पोलिसांचा बाप काढण्यापर्यंत या आमदाराची मजल गेली तरीही सरकार गप्प. आज RRआबा असते तर अशी बदली नक्कीचं झाली नसती. महिला सक्षमीकरणाच्या फक्त गप्पा मारणार्या सत्ताधार्यांचा आज खरा चेहरा जनतेसमोर आलाय.’ अशी टीका त्यांनी वेळी केली.

Updated : 30 May 2020 10:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top