Home > ‘त्या हरामखोर आमदाराने मला खूप मानसिक त्रास दिला’

‘त्या हरामखोर आमदाराने मला खूप मानसिक त्रास दिला’

‘त्या हरामखोर आमदाराने मला खूप मानसिक त्रास दिला’
X

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संगिता वानखेडे (Sangita Wankhede) यांनी एका व्हिडीओच्या माध्यामातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या व्हिडीओतून संगिता यांनी दिलीप मोहिते यांनी त्यांचा विनयभंग तसेच कार्यकर्त्याकडून त्यांना आणि त्यांच्या मुलींना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा...

सोशल मीडियावर दिलीप मोहिते यांचे कार्यकर्ते अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत आहेत. मी बोलताना शिवीगाळ करते म्हणून अनेकांनी मला ट्रोल केलं पण या आमदारामुळे १३ वर्षांपासून मी जे भोगलंय ते कोणालाच माहिती नाही. असं त्यांनी सांगितंलं आहे. या प्रकरणात पोलिसही त्यांना पाठीशी घालत असल्याचं संगिता यांनी म्हटलं आहे.

आपली व्यथा मांडताना संगिता वानखेडे यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे व्हिडीओच्या माध्यातून केले आहेत. दिलीप मोहिते यांनी त्यावेळी माझ्यासोबत जे काही केलं होतं ते आठवलं की मला रडायला येत. माझ्यासोबत त्याने जे काही केलं आहे. जे मी भोगलं आहे ते कोणालाही माहिती नाही. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर मोहिते याने माझी सुपारी दिली असल्याचंही संगिता यांनी म्हटलं आहे.

२०१८ साली दिलीप मोहिते पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळीही हे प्रकरण संगिता वानखेडे यांनी आमदार दिलीप मोहिते आणि पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे फार चर्चेत आलं होतं.

Updated : 3 Jun 2020 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top