Home > Political > ओव्हरटेक केल्यानं महिलेला भर चौकात मारहाण ! सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल

ओव्हरटेक केल्यानं महिलेला भर चौकात मारहाण ! सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल

ओव्हरटेक केल्यानं महिलेला भर चौकात मारहाण ! सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल
X

एका महिलेनं रस्यावर वाहन चालवताना ओव्हरटेक केल्यानं प्रचंड संतापलेल्या कार चालकानं महिलेला भर चौकात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. तर या प्रकारावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खाजदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. व सुप्रिया सुळे यांनी महिलेला मारहाण झालेला व्हिडिओ शेअर करत म्हटलं की ,राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते.
कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही ? या राज्यात महिला सुरक्षित आहेत का ? असा सवाल करत या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे. हे सगळ नागपूर शहरात एका कारला महिलेनं ओव्हरटेक केलं म्हणून तिला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला होता.

या मारहाणीचा व्हिडिओ रस्त्यातील एका व्यक्तीनं रेकॅार्ड केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला.Updated : 17 May 2024 11:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top