Home > Entertainment > दुखापत ग्रस्त एश्वर्या राय बच्चनला सांभाळताना दिसली १२ वर्षाची लेक;अराध्याच्या त्या व्हिडिओने वेधलं लक्ष

दुखापत ग्रस्त एश्वर्या राय बच्चनला सांभाळताना दिसली १२ वर्षाची लेक;अराध्याच्या त्या व्हिडिओने वेधलं लक्ष

दुखापत ग्रस्त एश्वर्या राय बच्चनला सांभाळताना दिसली १२ वर्षाची लेक;अराध्याच्या त्या व्हिडिओने वेधलं लक्ष
X

एश्वर्या राय बच्चन 'कान फिल्म फेस्टीवल' मध्ये सहभागी झाली. तिने गुरुवारी या प्रतिष्ठीत कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर वॅाक केला. तिचा कानमधील ग्लॅमरस लूक समोर आला आहे. चाहते एश्वर्याच्या लूकचं, तसेच तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करतं आहेत. एश्वर्याला हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर होतं, पण तरीही अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने उपस्थितांना भूरळ पाडली.

एश्वर्या ' कान फिल्म फेस्टीवल' मध्ये तिच्या मुलीबरोबर गेली आहे. तर तिचि १२ वर्षांची लेक आराध्या या सोहळ्यात चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. याचं कारण म्हणजे तिने आईची घेतलेली काळजी. रेड कार्पेटवरील वॅाकनंतर हॅाटेलमधून बाहेर पडताना आराध्या बच्चन हिने आईचा हात धरला आणि तिचा ड्रेस सांभाळण्यात तिला मदत केली. ती तिच्या आईचा हात धरुन चालतं होती. इतकचं नाही तर आराध्याने तिचा हात धरुन तिला पायऱ्या उतरण्यास मदत केली.

आराध्या व एश्वर्याचे हे व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर एका व्हिडिओमध्ये आराध्या आणि एश्वर्या हॅाटेलच्या लॅाबीमध्ये फिरतांना दिसत आहेत. त्यावेळी आराध्या तिच्या आईला आधार देताना दिसते. एश्वर्याने फ्रांन्सिस फोर्ड कोपोलाच्या 'मोगालोपोलिस' चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळी गोल्डन टच असलेल्या ब्लॅक एन्ड व्हाईट आउटफिटमध्ये रेड कार्पेटवर वॅाक केला. फाल्गुनी शेन पिकॅाकने हा ड्रेस डिसाइन केला होता.

तसेच २००२ पासून एश्वर्या 'कान फिल्म फेस्टीवल' मध्ये नियमित हजेरी लावत आहे. ती पहिल्यांदा शहारुख खान, संजय लिला भनसाळी, तसेच यांच्यासोबत 'देवदास' चित्रपटाच्या प्रिमियरसाठी या फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी झाली होती. तर गेल्या काही वर्षांत एश्वर्या लोरिअल या बॅंन्डची एम्बेसीडर म्हणून कानमध्ये रेड कार्पेटवर वॅाक करत असते. तसेच एश्वर्याची लाडकी लेक आराध्याही काही वर्षांपासून कान ला जात आहे.

तसेच यावर्षी फिल्म फेस्टीव्हलमध्ये एश्वर्याबरोबर अभिनेत्री कियारा अडवाणी, सोभिता धुलिपाला, अदिती राव इत्यादी अभिनेते सहभागी होणार आहेत.

Updated : 17 May 2024 8:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top