29 युट्युब चॅनेलविरोधात तृप्ती देसाई
X
‘काही YouTube चॅनल जाणीव पुर्वक माझी प्रतिमा मलिन करत आहेत’ तृप्ती देसाईंनी (Trupti Desai) केली 29 युट्युब चॅनेलविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल
भुमाता ब्रीगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी 29 युट्युब चॅनेलची मान्यता रद्द करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘काही YouTube चॅनल जाणीव पुर्वक माझी प्रतिमा मलिन करत आहेत. माझ्याविषयी शिवराळीची भाषा वापरलेले व्हिडिओ पोस्ट करत आहेत.
माझी समाजातील प्रतिमा मलिन व्हावी आणि स्वतःचा टीआरपी वाढावा म्हणून माझ्यासारख्या देशभरात आणि देशाबाहेर नामांकित व्यक्तीची/ महिलेची बदनामी करणाऱ्या पोस्ट व व्हिडीओ हे चॅलन अपलोड करत आहेत. तरी या चॅनलची मान्यता रद्द करावी’ अशी मागणी देसाई यांनी केली आहे.
हे ही वाचा
पंकजा मुंडेंचा हा लूक तुम्ही पाहिलाय का..
करोना लॉकडाउनमध्येही लोकांनी घेतला सूर्यग्रहण बघण्याचा आनंद…
महिला, अंधश्रद्धा आणि सूर्यग्रहण
काय आहे तृप्ती देसाईंच्या पत्रात?
प्रति, माननीय अनिलजी देशमुख,
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
अर्जदार -सौ.तृप्ती प्रशांत देसाई, संस्थापक अध्यक्ष -भूमाता ब्रिगेड, भूमाता फाउंडेशन.
विषय - खाली दिलेल्या यूट्यूब चैनल वरून माझी बदनामी करणारे, माझ्याविषयी शिवराळ भाषा वापरलेले व्हिडिओ माझी समाजातील प्रतिमा मलिन व्हावी यासाठी फक्त स्वतःचा टीआरपी वाढावा म्हणून माझ्यासारख्या देशभरात आणि देशाबाहेर नामांकित व्यक्तीची/ महिलेची बदनामी करणाऱ्या पोस्ट अपलोड केलेल्या लिंकनुसार/स्क्रीनशॉटनुसार या
सर्व यूट्यूब चैनलवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्र राज्यात आणि देशभरात स्त्री पुरुष समानता, महिला अत्याचार विरोधात तसेच वेगवेगळ्या विषयांवर मी एक प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षापासून काम करीत आहे.
माझ्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. माझी वाढती प्रसिद्धी पाहता अनेक काही मंडळी माझ्या विरोधात बोलले की स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी काही विनाकारण बदनामीकारक आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. त्यांनी केलेले बदनामीकारक आरोप, दिलेल्या अश्लिल शिव्या, कोणत्याही माहितीचा
आधार न घेता माझी मानहानी होईल अशी केलेली वक्तव्य काही यूट्यूब द्वारे फक्त स्वतःचे फॉलोवर्स वाढावेत किंवा टीआरपी वाढावा म्हणून अपलोड करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा, मला बदनाम करण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून केला जात आहे.
या सर्व यूट्यूब चैनलची नावे आणि त्यांनी माझी बदनामीकारक बातम्या केलेले व्हिडिओ आपणास सोबत जोडत आहे.