Latest News
Home > News > ‘दिल धक धक करने लगा’ गाण्याच्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

‘दिल धक धक करने लगा’ गाण्याच्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

‘दिल धक धक करने लगा’ गाण्याच्या कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन
X

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे निधन झाले. वयाच्या 71 व्या वर्षी मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वासोच्छवासात त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती.

हे ही वाचा

‘मी बांगड्या, कुंकु लावत नाही म्हणुन घटस्फोट होणं हे दुर्दैवी’

‘फसवणूक झालेल्या त्या मुलींनी न घाबरता पुढं येवून तक्रार नोंदवावी’ निलम गोऱ्हे यांचं आवाहन

अखेर ‘फेअर अँड लवली’ इतिहासजमा

20 जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ‘कोविड’ चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यांच्या पार्थिवावर सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. बॉलिवूडची नृत्यसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार, निम्रत कौर यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला...

Updated : 3 July 2020 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top