- कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक...
- प्रेयसीसाठी झालेल्या कर्जबाजारीच्या नैराश्यातून युवकाची आत्महत्या..?
- जळगावच्या तरुणाने एल्ब्रुसवर फडकविला तिरंगा..
- मुलींनी घातलेला ड्रेस 'सेक्सी' आहे कि नाही हे कोण ठरवणार ?
- गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
- Vinayak Mete : ''कदाचित याचा मास्टर माइंड एकच असू शकतो..'' दीपाली सय्यद यांची चौकशीची मागणी
- देशभक्तीपर गाणी म्हणत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन..
- या गावात विधवांच्या हस्ते ध्वजारोहण
- पंतप्रधानांनी भाषणात उल्लेख केलेल्या बेगम हजरत महाल कोण आहेत?
- महिलांना सन्मान मिळत नसल्याने मोदींनी व्यक्त केला खेद..

अखेर 'फेअर अँड लवली’ इतिहासजमा
X
वर्णभेदाचे आक्षेप घेतले गेल्यानंतर ‘फेअर अँड लवली’ या क्रीमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला गेला. हिंदुस्थान युनीलिव्हरने या क्रीम नाव बदलले आहे. आता ‘ग्लो अँड लवली’ या नव्या नावाने हे क्रीम बाजारात येणार आहे. तर पुरुषांच्या क्रीमचे नाव ‘ग्लो अँड हँडसम’ असे असणार आहे. पुढच्या काही महिन्यात बाजारात नव्या नावाने ही क्रीम उपलब्ध होणार असल्याचे हिंदुस्थान युनिलिव्हरने म्हटले आहे.
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस अत्याचारात मृत्यू झाला. त्यानंतर जगभरात ‘ब्लॅक लाईव्ह्स मॅटर’ ही मोठी चळवळ निर्माण झाली. या चळवळीमुळे जगभरात त्वचेचा रंग बदलण्याचा दावा करणाऱ्या कॉस्मेटीक कंपन्याही अडचणीत आल्या. बदलाच्या या वातावरणात त्वचा उजळण्याचा दावा करणाऱ्या ‘फेयर अँड लवली’ या फेयरनेस क्रीमचे नाव बदलण्याचा निर्णय युनिलिव्हरने घेतला होता. त्यानंतर गुरुवारी नवे नाव कंपनीने जाहीर केले.
सकारात्मक दृष्टीने कंपनीचे हे सर्वसमावेशक पाऊल असल्याचे कंपनीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. भविष्यातील त्वचा उत्पादने या नवीन दृष्टीकोनावर आधारीत असतील असं कंपनीने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
गेल्या 45 वर्षांपासून ‘फेअर अँड लवली’ ही स्किन फेअरनेस क्रीम भारतात आणि दक्षिण आशियातील काही देशामध्ये अंत्यत लोकप्रिय आहे. गोऱ्या त्वचेसाठी हे क्रीम वापरा असा दावादेखील कंपनीच्या जाहिरातीमध्ये केला जातो. अनेक प्रसिध्द अभिनेत्रींनी या क्रीमच्या जाहिराती केल्या आहेत.
देशातील फेयरनेस क्रीमच्या मार्केटमध्ये ‘फेयर अँड लवली’चा 40 टक्के वाटा आहे. नव्या नावासाठी कंपनीने अर्ज केला असून, मंजुरी मिळाल्यानंतर काही महिन्यात नव्या नावाने हे उत्पादन बाजारात उतरवणार असल्याचे हिदुंस्तान युनिलिव्हरने म्हटले आहे.