Home > News > मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
X

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या कुटुंबीयांतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे वयाच्या 49 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंदिरा बेदी आणि तिच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्का देणारी आहे. मंदिरा आणि राज यांना दोन मुले आहेत. सोशल मीडियावरील त्यांचे चाहते राज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत.

राज कौशल हे व्यवसायाने दिग्दर्शक आणि निर्माता होते. राज कौशल यांनी, एंथनी कौन है, शादी का लड्डू, प्यार में कभी कभी 'या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचे फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न झाले होते. 19 जून 2011 रोजी मंदिराने मुलगा वीरला जन्म दिला. तसेच गेल्या वर्षी मंदिरा बेदी आणि राज यांनी 4 वर्षाची मुलगी दत्तक घेतली होती. ज्याचे नाव तारा बेदी कौशल आहे.

Updated : 30 Jun 2021 5:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top