Home > News > अक्षय तृतायेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी ! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ

अक्षय तृतायेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी ! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ

अक्षय तृतायेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी ! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ
X

पारंपारिक खरेदीच्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने पून्हा एकदा महागले असल्याचे दिसून येतं आहे. तर शुक्रवारी खरेदीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली. वार्षीक तुलनेत सोन्याचा दर १३ हजार रुपयांनी वाढूनही मागणीही जवळपास १० ते १५ टक्यांनी अधीक राहील्याचा सराप बाजारात प्रमुख पेढ्यांनी दावा केला आहे.

जागतिक कल आणि मजबूत देशांतर्गत मागणीच्या जोरावर शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत दहा ग्रॅम सोन्याच्या दराने १,५०६ रुपयांची उसळी घेत ७३,००८ रुपयांचा टप्पा गाठला. चांदीचा भावही २,३०० रुपयांनी वाढून ८५,५०० रुपये प्रति किलो झाला. गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दहाग्रॅम सोन्याच्या दर ५९,८४५ रुपयांवर होते. म्हणजेच वर्षभरात सोन्याचे दर तोळ्यामागे १३,१६३ रुपयांनी महागले आहेत.

हलक्या वजनाच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी होती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीत ५ ते १० टक्के घट होण्याची अपेक्षा होती. मात्र ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आणि मागणीत प्रत्यक्षात वाढली. अक्षय्य तृतीयेच्या केवळ एका दिवसात देशभरात सुमारे २० ते २२ टन सोन्याची विक्री झाल्याचे नमूद करीत, दक्षिणेत सर्वाधिक ३० ते ४० टक्के विक्री झाल्याचे ते म्हणाले.

अक्षय्य तृतीतेचा मुहूर्त साधण्यासाठी १० दिवस आधीपासून ग्राहक सोने खरेदी नोंदवत असतात. त्यामुळे शुक्रवारच्या खरेदीबरोबरीनेच, शनिवारी व रविवारीही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. जडशीळ दागिने आणि नाण्यांना मागणी कायम आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांना आश्चर्यकारकपणे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूणच यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अपेक्षेनुसार विक्री अनुभवास येत आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.

Updated : 11 May 2024 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top