Home > News > सोने चांदीच्या भावात मोठी घसरण, मागील चार महिन्‍यातील निच्‍चांकी आकडा

सोने चांदीच्या भावात मोठी घसरण, मागील चार महिन्‍यातील निच्‍चांकी आकडा

सोने चांदीच्या भावात मोठीं घसरण ; आठवडा भरात सोन्याचे भाव 1800 रुपयांची , तर चांदी दोन हजारांनी घसरली

सोने चांदीच्या भावात मोठी घसरण, मागील चार महिन्‍यातील निच्‍चांकी आकडा
X

गेल्या आठवड्यापासून सोने भावात सातत्याने घसरण होत असून आज आणखीन भाव घसरल्याने सुवर्ण बाजार गडगडला आहे. सोन्याच्या दरात देखील मागील आठ दिवसात तब्‍बल अठराशे रूपये तर एकाच दिवसात १३०० रुपयांची घसरण होऊन सोने जीएसटीसह ४७ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले आहे. गेल्या चार महिन्यातील सोने व चांदीतील ही सर्वात मोठी घसरण आहे.एकाच दिवसात चांदीच्या भावात दोन हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६६ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. सुवर्ण बाजार भावाचा आलेख खाली आला असून, मागील चार महिन्‍यातील निच्‍चांकी आकडा आहे. कोरोना काळात ५८ हजार रुपयांवर पोहचलेल्‍या सोन्याच्‍या दरात मोठी घसरण झाली आहे. तर चांदीच्‍या दरात देखील मोठी घसरण झाल्‍याने सुवर्ण बाजार गडगडला आहे

आंतरराष्ट्रीय सट्टा बाजारातही सोन्याचा उठाव कमी झाला आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने- चांदीच्या मागणीवर परिणाम होऊन त्यांचे भाव कमी होत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत रूपया काही प्रमाणात मजबूत झाल्‍याचा परिणाम सोन्‍याच्‍या मार्केटवर झाला आहे. आगस्ट मध्ये सर्वात कमीभाव सोने व चांदीचे झाले आहे.अस सोने व्यापाराचे जाणकार स्वरूप लुंकड यांनी म्हटलं आहे.आता ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची आहे त्यांनी पूर्ण गुंतवणूक न करता 30 टक्के गुंतवणूक करावी असंही लुंकड यांनी सोन्यात गुतवणूक करणाऱ्यांना सल्ला दिला आहे.

Updated : 10 Aug 2021 2:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top