Home > News > ट्वीटरवर ट्रेड होणाऱ्या #SainteMarielaMer या हॅशटॅग चा उद्देश तुम्हाला माहिती आहे का?

ट्वीटरवर ट्रेड होणाऱ्या #SainteMarielaMer या हॅशटॅग चा उद्देश तुम्हाला माहिती आहे का?

ट्वीटरवर ट्रेड होणाऱ्या #SainteMarielaMer या हॅशटॅग चा उद्देश तुम्हाला माहिती आहे का?
X

सध्या ट्वीटर वर #SainteMarielaMer हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. हा हॅश टॅग कुणाला ट्रोल करण्यासाठी नसुन महिलांच्या हक्कांसाठी फ्रान्समधे ट्रेंड झाला आहे. काही दिवसांपुर्वी फ्रान्सच्या (France) सेंट-मेरी-ला-मेर (Saintes Maries dela Mer )या समुद्रकिनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस (topless) होऊन सनबाथ घेत होत्या. या महिला धुम्रपानही करत होती. त्यावेळी तेथे पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाने यासंदर्भात पोलीसांत तक्रार केली. या कुटुंबाला महिलांना असं अर्धनग्न अवस्थेत पाहणं योग्य वाटत नसल्याने त्यांनी तक्रार केली. या दोन्ही गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलांजवळ जाऊन त्यांना टॉप घालण्याची आणि छाती झाकण्याची विनंती केली.

मात्र हे प्रकरण नंतर चांगलं तापलं आणि थेट व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचे आरोप करण्यात आले. अगदी सोशल मिडियापासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनी या विषयावर #SainteMarielaMer हा टॅग वापरुन आपली वेगवगेळी मत व्यक्त केली.

हे ही वाचा...

टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलांना पोलीसांचा दम, गृहमंत्र्यांनी पोलीसांना झापलं

Act of God : निर्मला सितारमण यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय?

आता ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचाराचा कालावधी आणि खर्च कमी होणार

पश्चिम बंगालच्या शाळा 20 सप्टेंबरपर्यंत बंद, मुख्यमंत्री ममदा बॅनर्जी यांचे आदेश

या संदर्भांत फ्रान्सच्या सेंट-मेरी-ला-मेर पोलीसांनी एक प्रेस नोट जारी केली असून यात त्यांनी ‘ समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाबरोबर लहान मुलंही होती. त्यांनी पोलिसांना विनंती केली की त्यांनी टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलांना कपडे घालण्यास सांगावे. या दोन्ही गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलांजवळ जाऊन त्यांना टॉप घालण्याची आणि छाती झाकण्याची विनंती केली, असं म्हटलं आहे.

या संदर्भात फ्रान्सच्या पोलीस प्रवक्त्या लेफ्टनंट कर्नल मैडी श्यरर यांनी ‘तुम्हाला मी नेहमी पोलिसांच्या गणवेशात दिसेन मात्र सेंट-मरी-ला-मेर समुद्रकिनाऱ्यावर टॉपलेस राहून सनबाथ घेण्यास अनुमती आहे.’ अशी तिरकस प्रतिक्रीया दिली आहे.

तर फ्रान्सचे गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनी ‘टॉपलेस स्थितीतील महिलांना कपडे घालण्यासंदर्भात सूचना करणं चुकीचं असून स्वातंत्र्य हे मैल्यवान आहे. तसेच प्रशासनाकडून चूक झाली हे स्वीकारलं पाहिजे.’ असं म्हटलं आहे.

Updated : 28 Aug 2020 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top