संतापजनक : डॉक्टरने केली रुग्ण महिलेकडे शरीरसुखाची मागणी
X
तपासणीस आलेल्या रुग्ण महिलेकडे चक्क डॉक्टरकडूनच शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन डॉक्टर रामहरी लाड याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेला उपचारासाठी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्रीच्या वेळेस डॉ. रामहरी लाड यांनी सदर पीडितेला तपासणीच्या नावाखाली बोलून त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानुसार पीडित महिला डॉक्टरांच्या केबिन मध्ये आली असता डॉक्टरांनी महिलेला गुप्तांगातून तपासणी करायची असल्याचे सांगितले. यावेळी पीडितेने माझ्या पालकांना सांगा त्यानंतर पाहू असे म्हटले असता डॉ. लाड यांनी तू कोणालाही काही बोलू नकोस थांब असे म्हणून तिच्याकडे शरीरसुखाची इच्छा व्यक्त केली.
हे ही वाचा
नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती – वर्षा गायकवाड
‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका…’ – सुप्रिया सुळे
याबाबत पीडितेने शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी न्हावरा येथील नाथकृपा हॉस्पिटल चे संचालक डॉ. रामहरी भुजंगराव लाड रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहेत.