Home > रिपोर्ट > सावधान! : प्रसिद्धीसाठीचा एक कॉल तुम्हांला अश्लील व्हीडिओ स्कॅम अडकवू शकतो...

सावधान! : प्रसिद्धीसाठीचा एक कॉल तुम्हांला अश्लील व्हीडिओ स्कॅम अडकवू शकतो...

सावधान! : प्रसिद्धीसाठीचा एक कॉल तुम्हांला अश्लील व्हीडिओ स्कॅम अडकवू शकतो...
X

ब्लू टीक आणि सोशल मीडियामधील फॉलोअर्सच्या संख्येचे आकर्षण असलेल्या तरुणींनो सावधान....

हॉट ट्रॅव्हेल हॉटेल्सतर्फे (+16469680285) जेसनने मला वॉट्सअपवर संपर्क केला. माझे इन्स्टाग्रामचे फोटो आवडल्याचे सांगितले आणि त्याचे प्रोफाईल तपासून पाहायला सांगितले. तो एक प्रभावशाली व्यक्ती असून सेलिब्रिटीसुद्धा त्याला फॉलो करत असल्याचं त्याने सांगितले. (माझा मोबाईल नंबर त्याला कसा मिळाला ते माहिती नाही). ब्लू टीक असलेले त्याचे फॉलोअर्स आहेत आणि मोनिका डोग्राही नकळतपणे त्याला फॉलो करतेय, मोनिका शर्मा डोग्रा. विलगीकरणामुळे मला हे प्रकरण शोधून काढायला वेळ मिळाला.

त्यानंतर त्याने मला माझे फोटो पाठवायला सांगितले आणि Designated Survivor मधील मुख्य भूमिकेसाठी रीड हेस्टिंग्ज याला मी आवडले असल्याने तो मला स्काईप कॉल करणार आहे असं सांगण्यात आले. मला एका गुप्तहेराच्या भूमिकेविषयी सांगितले गेले आणि आधीच कोरोनामुळे उशीर झाला असल्याने रीड यांना खूप घाई असल्याची बतावणीही करण्यात आली. रीड हेस्टिंग्जविषयी माहिती नसेल तर गुगलवर शोधा, तो NETFLIXचा जन्मदाता आहे.

त्यानंतर जेसनने मला माझे काही फोटो मागितले, मीसुद्धा माझे आधीच सार्वजनिक असलेले जुने फोटो त्याला पाठवले. (मला माहितीये मी चुकीचे केले पण मला या स्कॅमचा छडा लावायचा होता आणि रीड जो मला स्काईप कॉल करणार होता त्याचा चेहरा पहायचा होता.)

हे ही वाचा। अति चहा… धोके पहा!

अखेर मला reed.hastings@netflix.com.वरुन स्काईप कॉल आला. “मी व्हिडिओ कॉल करुन व्हिडिओचा पर्याय ऑन ठेवायचा पण तो मात्र चेहरा न दाखवता फक्त टेक्स मेसेजवर बोलणार कारण त्याला तांत्रिक अडचणीत आहेत,” असे त्याने मला सांगितले. रीड सारख्या माणसालाही डाटा पॅकच्या समस्या येतात हे आश्चर्यकारक होते.

फसवं आहे खरंच !

स्काईप कॉल खरा आहे हे आणि अधिकृत मेल आयडीवरुन चॅटिंग करत असल्याने या तथाकथित रीडने प्रोजेक्टचे काही डिसक्लेमर मला पाठवले. त्यानंतर Designated Survivor चे कथानक सांगितले आणि भूमिका जरा बोल्ड असल्याने एक्टिंग ऑडिशन पद्धत असेल असेही सांगितले.

हो- त्याचक्षणी तो कॉल मी कट करायला हवा होता पण माझ्यातील पत्रकाराने हे प्रकरण नेमके काय आहे हे पाहण्याचे ठरवले. त्यानंतर त्याने मला माझे दोन्ही बाजूचे प्रोफाईल दाखवायला सांगितले आणि मीसुद्धा ते आनंदाने केले. पण जेव्हा त्याने मला ३० सेकंदांचा एखादा बोल्ड अभिनयाचा नमुना सादर करण्यास त्याने सांगितले तेव्हा मी ते कऱण्यास नकार दिला. तेव्हा,”बोल्ड म्हणजे किमान उत्तेजक हावभाव केले तरच तुझ्यात मला रस आहे,” असे त्याने सांगितले. त्याने मला गुडबाय म्हटले आणि फोन कट केला. त्या मुख्य भूमिकेसाठी मला नकार देण्यात आला होता. मग स्वाभाविकच ते डिसक्लेमरही गायब झाले आणि ब्लॉकींगही झाले.

हे ही वाचा। CoronaLockdown : ‘ती’ आई मुलाचं शव घेऊन रस्त्याने धावत होती

या सगळ्याचा अर्थ मात्र एकच आहे अनेक वेबसाईटवर किंवा पोर्न वेबसाईटवर आपण जे छोटे छोटे व्हिडिओ पाहतो, त्याच्या जाळात काही मुली केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अडकतात. त्यात नेटफ्लिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडचे नाव वापरले तर मुली फसतातच....

सावधान! Shrishti Behl @Netflix India, Shweta Poojari @netflix कृपया याची नोंद घ्या.

प्रत्येकाला अंध फॉलोअर्स पाहिजे आणि ब्लू टीक्स आणि एक लाख किंवा १ कोटी फॉलोअर्सच्या आकर्षणाच्या काळात

हे खूप मोठे स्कॅम असू शकेत आणि प्रत्येक मुलगी एवढी जागरुक किंवा पत्रकार नसते की जी माझ्यासारखी यातून सुखरुप बाहेर येईल.

Updated : 12 April 2020 1:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top