Home > Max Woman Blog > अति चहा... धोके पहा!  

अति चहा... धोके पहा!  

अति चहा... धोके पहा!  
X

घरी येणाऱ्या प्रत्येकाचं आतिथ्य चहाने केलं की आपल्याला बरं वाटतं. चर्चा, लिखाण करतानाही चहाची जोड असली तर त्या चर्चा किंवा लिखाण रंगलं असं वाटतं.

कुटुंबाबरोबर खरेदीनंतर, अचानक भेटलेल्या मित्राबरोबर दहा मिनिटे रस्त्यातच घालवायची असल्यास, नवख्या ठिकाणी एखाद्याची वाट पाहताना वेळ काढायचा असेल तेव्हा... एक ना दोन अनेक निमित्तं आहेत जेव्हा आपल्याला या चहाची सोबत हवीशी वाटते! पण ही संगत खरोखरच फलदायी आहे का?

चहा घरी केलेला असतो तेव्हा बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्याला चांगलं नाही. यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफुगी अशा समस्या उद्भवतात. चहा घ्यायचा तर त्यात कमीत कमी दूध आणि पाणी जास्तअसं प्रमाण हवं.

हे ही वाचा। सावधान! : प्रसिद्धीसाठीचा एक कॉल तुम्हांला अश्लील व्हीडिओ स्कॅम अडकवू शकतो…

सर्वात बेस्ट म्हणजे ब्लॅक टी. Black tea, Lemon tea, आलं नि गुळाचा चहा तर एक नंबर! (१०० वर्षं जगा पण गुळाचा चहा प्या) याशिवाय साखर हा चहामधला घटक प्रचंड उपद्रवी असतो. ९०% आजार पोटातून होतात, हे तर सर्वांना सतत सांगितलं जातं. साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटाचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील.

चहाचे दुष्परिणाम :

१. दिवसाला ५ ते १० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणाऱ्या व्यक्तींची पचनशक्ती बिघडून अम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध असे विकार जडतात.

२. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठी कामे, बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा घेणं चांगलं, असाही समज योग्य नाही. कारण असा चहासुद्धा पुष्कळ प्रमाणात प्यायला तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, रक्तदाब वाढणे, पक्षाघात होण्याची शक्यता बळावते. कोऱ्या चहाचं अतिसेवन शुक्राणूंची संख्या अल्प होण्यास कारणीभूत ठरतं.

४. दूध, साखर व चहा पावडर एकत्र उकळून केलेला चहा कफ-पित्त-वात वाढवणारा तसेच उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवरचा चहा अॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अॅल्युमिनिअम धातूच्या भांड्यात बनवलेल्या खाद्यपदार्थांमधून हा घातक धातू शरीरात जातो. याच्य परिणामी ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखे असाध्य विकार जडतात.

हे ही वाचा। Covid19: ‘जान भी जहान भी’, आर्थिक नियोजनांसह लॉकडाऊन कायम राहणार

६. चहा दिवसाला २ वेळा प्यायल्यास (१० रू./चहा असे) वर्षाचे ७२०० रु. होतात. तर ५ वर्षांचे ३६,००० रु. होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्रमाणात प्यायचं पेय नाही.

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही... हे सवयीमुळे होतं. शौचाचा वेग निर्माण करणं हे चहाचं काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडं ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो. साखरेचा चहा नेहमी प्यायल्यामुळे रक्तातील आम्लता वाढते. परिणामी कॅन्सरसारखे विकारही होऊ शकतात. कारण कॅन्सरसाठी पोषक वातावरण साखर तयार करत असते.

१०. चहाबरोबर चटकमटक पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते. अशा पदार्थांमध्ये मीठ जास्त प्रमाणात असतं. मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीराला अधिकच मारक बनतो.

खरं पाहता 'चहा' हा दारूपेक्षाही जास्त घातक आहे पण दारू बदनाम आहे चहा नाही. रिकाम्या पोटी तर तो जास्त मारक ठरतो. त्यामुळे काहीतरी खाऊनच चहा घेणं- तोही गुळाचा नि योग्य प्रमाणात -श्रेयस्कर.

डॉ. सतीश सूर्यवंशी

Updated : 12 April 2020 12:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top