Home > Max Woman Blog > सरकार महिला कंडोमची जाहीरात खुलेआम कधी करणार?

सरकार महिला कंडोमची जाहीरात खुलेआम कधी करणार?

सरकार महिला कंडोमची जाहीरात खुलेआम कधी करणार?
X

26 सप्टेंबर हा दिवस जगभरात संतती नियमन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या 1970 च्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात जन्माचे नियंत्रण, दोन मुलांमधील अंतर, वंध्यत्वावर सल्ला, पालकांचे शिक्षण,लैंगिक शिक्षण,अविवाहित मातांना आरोग्य सेवा पुरवणे, विवाहपूर्व समुपदेशन, जनुकीय समुपदेशन, घराचं अर्थशास्त्र आणि पोषण यासह ईतर अनेक मुद्यांवर भर देण्यात आलेला आहे.

भारतामध्येही संतती नियमनाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झालेली आहे. भारतामध्ये संतती नियमनाबाबातची जनजागृती करण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने र. धो. कर्वे आणि डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातं. र. धो. कर्वे यांनी समाजस्वास्थ्य या मासिकातुन लैंगिक शिक्षण, संतती नियमनानची साधने यावर भर दिला होता. या त्यांच्या लैंगिक शिक्षण जनजागृती मुळे समाजस्वास्थ्य बिघडत असल्याचं सांगत काही सनातनी मनुवादी लोकांनी त्यांच्यावर खटले दाखल केले होते.

यातील एका खटल्यात र.धो. कर्वे यांचे वकील म्हणून डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा खटला लढले होते. तो खटला माहीतीचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आज ऊपलब्ध आहे. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संतती नियमन विधेयक सुद्धा विधीमंडळात स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदाराला मांडण्यासाठी लिहून दिले होते. जे विरोधामुळे मंजूर झाले नव्हते.

आज यामुळेच 94 टक्के जनता याबाबतीत जागरुक आहे. यामुळे भारतातील जन्मदर मोठ्या प्रमाणावर नियंत्रित झालेला आहे. असं म्हणता येईल. याबाबतचं काम महिला बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाकडे आहे. याबाबतच्या बऱ्याच गोष्टी केंद्र सरकारच्या एन.आर एच.एम. या कार्यक्रमाअंतर्गत येतात. ज्यात माता म्रत्यू टाळणे बालमृत्यू कमी करणे, जननी सुरक्षा योजना अशा अनेक योजना सरकार राबवत आहे.

संतती नियमनाबाबत वेळोवेळी सरकार सामाजिक संस्था, संघटना या बाबतीत जनजागृती कार्यक्रम, मोहीम राबवतात. कारण असं म्हटलं जातं की, संतती नियमनाची साधने जर महिलांना उपलब्ध झाली तर बालकांचे म्रत्यू दर आणि महिलांचा म्रत्यू दरकमी होऊ शकतो.

हे ही वाचा...

पत्नीला लठ्ठपणावरुन टोमणा मारताय? थांबा हे वाचा !

डोकं फिरलंया बयेचं…

कमळाची शिकवण…!

पण भारतामध्ये संतती नियमनाची साधने जी काही उपलब्ध आहेत. त्यात महिलांचे दुय्यम स्थान असल्याने पुरुष प्रधानव्यवस्थेचं महिलांवर सत्ता, संपत्ती आणि संततीच्या माध्यमातून नियंत्रण आहे. त्यात फार मोठ्या प्रमाणावर महिलांना एक तर ही साधने वापरण्याची किंवा न वापरु देण्याची सक्ती केली जाते. आजही पुरुष नसबंदी करण्यासाठी मर्दानगी जाईल. या भितीमुळे फार कमी पुरूष लोक कुटंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येतात.

पुरूषांचे कंडोम स्वस्त किंवा मोफत असतात. पण महिलांचे कंडोम महाग असतात. (बहुतांश) आजही अनेक स्त्रियांवर मुलाच्या हव्यासापोटी अनेक बाळंतपणे लादली जातात. खूप साऱ्या महिला काँपर टी बसवताना भितात (गर्भपिशवीत अडकेल,कँन्सर होईल)

आजही कंडोम वापरणाऱ्या स्त्रिया म्हणजे बाहेरख्याली धंदेवाल्या असा समज आहे. लैंगिक शिक्षणावर आजही दबक्या आवाजात बोललं जातं. संतती नियमनाची साधने निवडण्याचे, मुलं होऊ द्यायचे की नाही, किती होऊ द्यावेत. या बाबतीत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य फार कमी महिलांना आहे. असं दिसुन येतं.

यामुळे संततीनियमनाची साधने उपलब्ध असून भागत नाही. तर ते वापरण्याचे स्वातंत्र्य महिलांना असावे. याचबरोबर स्त्री पुरुष समानता मानणारे आपले पुरोगामी महाराष्ट्र ज्या पद्धतीने पुरुष कंडोमची जाहीरात मनमोकळेपणाने करतं आणि त्यात सेलिब्रिटी महिलांचा वापर करतं. तेवढ्याच हिंमतीने महिला कंडोमची जाहिरात सरेआम खुलेआम करेल का?

सत्यभामा सौंदरमल

एम ए.. समाजशास्त्र एम.एस.डब्ल्यू

निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था बीड

(सदर पोस्ट सत्यभामा सौंदरमल यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)

Updated : 27 Sep 2020 6:49 AM GMT
Next Story
Share it
Top