Home > रिपोर्ट > तरुणांनो सावधान! कोरोनाचा सर्वाधिक धोका तुम्हालाच..

तरुणांनो सावधान! कोरोनाचा सर्वाधिक धोका तुम्हालाच..

तरुणांनो सावधान! कोरोनाचा सर्वाधिक धोका तुम्हालाच..
X

कोरोना विषाणू चा (Covid 19) प्रसार होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन (Lockdown 2) च्या नियमांचं पालन काटकोरपणे करण्याचे आदेश सतत दिले जात आहेत. लोकांना घरात बसवण्यासाठी पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत. नवनवीन युक्तया काढून, विनंती करून वेळ पडल्यास लाठ्यांचे फटके देऊन लोकांना बाहेर पडण्यापासून थांबवत आहेत. काही भागात नागरिकांनी पोलिसांवर हल्लेही केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

हे ही वाचा..

सरकार आणि पोलिसांकडून सतत प्रयत्न करुनही काही व्यक्ती बाहेर आवश्यकता नसतानाही फिरतच आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण तरुणांचं आहे. याच कारण म्हणजे तरुणांना कोरोना विषाणूची बाधा लवकर होत नाही असा गैरसमज आहे. तरुणांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळे कोरोना होत नाही असा चुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल एज्युकेशन आणि ड्रग्ज डिपार्टमेंट (MEDD) अंतर्गत सादर करण्यात आलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या अहवालानुसार तरुणांमधील कोरोना रग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने ३० एप्रिलपर्यंत सादर केलेल्या अहवालात राज्यातील एकूण बाधितांच्या संख्येपैकी सर्वाधिक प्रमाणात तरुणांना लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तरुणांना कोरोनाची बाधा होत नाही हा समजही आता खोटा आहे.

MEDD च्या अहवालानुसार २१ ते ३० वयोगटातील २०७८ रुग्ण सापडले आहेत. तर ३१ ते ४० वयोगटात १९६२ रुग्ण आहेत. तसेच ११ ते २० वयोगटातील अल्पवयीन मुलांची संख्या ७२५ आहे. इतर वयोगचातील रुग्णसंख्या तरुणांच्या तुलनेत कमी आहे. सोबत दिलेल्या आलेखात तुम्ही पाहू शकता.

Age wise corona Covid 19 cases (३१ एप्रिल पर्यंतच्या ९२७१ कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार)

दुसरीकडे तरुणांमधील कोरोना बाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी असल्याचही अहवालात म्हटलंय. सर्वाधिक मृत्यू प्रमाण ५१ ते ६० या वयोगटात असून १०८ व्यक्ती दगावले आहेत. त्यापाठोपाठ ६१ ते ७० वयोगटातील १०१ वृद्धांचा मृत्यू झाला आहे. पुढील आलेखात आपण वयोमानानुसार मृत्यूचं प्रमाण पाहू शकता.

Age wise death cases of covid 19

(३१ एप्रिल पर्यंतच्या ९२७१ कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार)एकुणच यातून स्पष्ट होते आहे की, तरुणांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रसार होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, वयस्क व्यक्तींच्या तुलनेत तरुणांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्याने त्यांना कोरोनाची लक्षण लवकर दिसून येत नाहीत. परिणामी बेफिकिरीने ते प्रसार करण्यास मदत करतात. आपल्या कुटुंबियांच्या आणि स्वकीयांच्या सुरक्षेसाठी तरुणांनी काळजी घेणं फारचं गरजेचं आहे.

Updated : 1 May 2020 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top