Home > रिपोर्ट > Lockdown च्या काळातही साईबाबांच्या झोळीत 2 कोटी रुपयांचे दान

Lockdown च्या काळातही साईबाबांच्या झोळीत 2 कोटी रुपयांचे दान

Lockdown च्या काळातही साईबाबांच्या झोळीत 2 कोटी रुपयांचे दान
X

कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे दिनांक १७ मार्च पासून सर्व धर्माची शिकवण देणारे साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले असताना, दिनांक १७ मार्च ते दिनांक ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानाला प्राप्‍त झाली आहे. अशी माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा...

देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होऊ नये. म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे.

साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्‍तांनी बाबांना दक्षिणा देण्‍याची परंपरा सुरु ठेवली असून जगाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातुन साईभक्‍त संकेतस्‍थळाव्‍दारे व मोबाईल अॅप्‍सव्‍दारे ऑनलाईन देणगी संस्‍थानला पाठवत आहे. दिनांक १७ मार्च ते ०३ मे २०२० अशा ४८ दिवसाच्‍या या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०२ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असल्‍याचे डोंगरे यांनी सांगितले.

Updated : 4 May 2020 7:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top