Home > रिपोर्ट > राज्यात एका दिवसात ११ कोरोना बाधितांची चिंताजनक वाढ

राज्यात एका दिवसात ११ कोरोना बाधितांची चिंताजनक वाढ

राज्यात एका दिवसात ११ कोरोना बाधितांची चिंताजनक वाढ
X

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती शनिवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

राज्यातील शुक्रवारी कोरोना रुग्णांचा ५२ असलेला आकडा शनिवारी थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यापैकी ८ हे परदेश दौऱ्यावरून आलेले रूग्ण आहेत. तर ३ जणांना संसर्गामुळे करोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

हे ही वाचा...

पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. रूग्णांची वाढती संख्या पाहता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अधिक चाचणी केंद्र उभारण्यासाठी परवानगी देणार असल्याचं सांगितलं.”

“मुंबई, पुण्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढू लागलीये. त्यामुळे रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. जेणेकरून सध्या रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी कमी होईल. गर्दी कमी होणार नसेल तर मुंबईत लोकल सेवा बंद करावीच लागेल,” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

Updated : 21 March 2020 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top