Home > रिपोर्ट > 'महाराष्ट्राच्या जीवाशी खेळू नका', रुपाली चाकणकरांचा मोदींना इशारा

'महाराष्ट्राच्या जीवाशी खेळू नका', रुपाली चाकणकरांचा मोदींना इशारा

महाराष्ट्राच्या जीवाशी खेळू नका, रुपाली चाकणकरांचा मोदींना इशारा
X

कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट ची (PPE ) मोठ्या प्रमाणात आवश्यकता असताना केंद्र सरकारने या संसाधनाची अपुऱ्या प्रमाणात पूर्तता केल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यास जबाबदारी कोण घेणार असा सवाल विचारला आहे.

हे ही वाचा..

राज्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येसह आरोग्य सेवकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. कोरोनाच्या लढाईत पहिल्या फळीतील डॉक्टर आणि आरोग्य सेवकांसाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (PPE ) किटचा मोठा तुटवडा भासत आहे. म्हणून केंद्र सरकारकडे राज्याने ३.५ लाख PPE किट आणि ८ लाख N-95 मास्कची मागणी केली होती. मात्र केंद्र सरकारने फक्त ३० हजार PPE किट्स आणि १ लाख N-95 मास्क दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली होती.

केंद्राच्या अशा दुजाभावामुळे जर केसेस वाढल्या तर केंद्र याची जबाबदारी घेणार आहे का? अशी विचारणा करत चाकणकर यांनी नरेंद्र मोदींना 'महाराष्ट्राच्या जीवाशी खेळू नका' असा इशारा दिलाय.

Updated : 19 April 2020 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top