Home > Know Your Rights > आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त max woman चे ‘एकल महिला’ विशेष बेलेटीन

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त max woman चे ‘एकल महिला’ विशेष बेलेटीन

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त max woman चे ‘एकल महिला’ विशेष बेलेटीन
X

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त max woman चे एकल महिला विशेष बेलेटीन

करोनामुळे जगभरात विधवा महिलांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे हातचा गेलेला रोजगार त्यांना हतबल करणारा आहे. एकंदरित जगभरातील विधवा महिलांची सद्यस्थिती काय? आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त लेखिका रेणुका कड यांनी विधवा महिलांची मांडलेली अभ्यासपूर्वक वस्तुस्थिती... नक्की वाचा 'कोविड १९ आणि विधवांचं जिणं' हा लेख

समाजात एकल स्त्री म्हणून जगत असताना त्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात अनेक अडचणींना सामोऱ्या जात आहेत. समाजात अनेक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग दिसत आहे. शिक्षणामुळे स्त्रियांची प्रगती होत आहे. मात्र दुसरीकडे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे. त्यामुळे आधी 'एकल महिला म्हणजे कोण?' हे समजणं आवश्यक आहे...

एकल महिलांचे प्रश्न हे आजही फार चर्चेत नसतात त्या प्रश्नात विविधताही आहे. मात्र या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. जमिनीचा हक्क आणि एकल स्त्रियांचे होणारे लैंगिक शोषण असे महत्त्वपूर्ण विषय माध्यमांवर येण्याची अवश्यकता आहे. यासाठी अनेक महिलांनी आवाज उठवायला सुध्दा सुरुवात केली आहे. महिलांचा हा संघर्ष जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी ‘एकल महिलांचे लढे’

‘मी याच जन्मावर रडत नाही तर लढत आहे. वायद्याची शेती फायद्यात आणेल, अडचणीच्या काळात दिल्लीची नाय, गल्लीची बाय मदतीला येते. मला व्यवस्थेने विधवा बनवले आहे. पण मी विधवा नाही, तर एकल महिला आहे’ हे मनोगत आहे वैशाली येडे यांचं. त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटना वेळी व्यक्त केलं होतं.

या समाजाला आत्महत्या केलेला शेतकरी दिसतो मात्र त्याच्या पश्चात असलेली बायकोचा खडतर प्रवास नाही दिसत. इथे बोलणारी बाई नाही तर डोलणारी आणि डौलवणाराी बाई पाहिजे. एकटी बाई सर्वांना संधी सारखी वाटते अशा शब्दात वैशाली येडे यांनी साहित्य संमेलनात मनोगत व्यक्त केलं होतं. संपुर्ण मनोगत पहाण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

https://www.maxwoman.in/news/vaishali-yede-talk-about-after-farmer-sucide-what-is-life-of-his-wife/14547/

Updated : 24 Jun 2020 2:06 PM GMT
Next Story
Share it
Top