Home > Max Woman Blog > 'एकल महिला' म्हणजे कोण?

'एकल महिला' म्हणजे कोण?

एकल महिला म्हणजे कोण?
X

एकट्या राहणा-या म्हणजेच ज्यांनी लग्न केले नाही, ज्यांच्या पतीचे निधन झालेले आहे किंवा पतीने दुसरे लग्न करून महिलेला सोडून दिले आहे अश्या सर्व महिलांचा समावेश एकल महिलांमध्ये येतो. याबरोबरच बलात्कार झाल्याने किंवा अन्य काही कारणाने महिलेला कुटुंबात स्थान दिले जात नाही अश्यावेळी ती एकटी राहते या सर्व महिलांचा एकल महिलांमध्ये समावेश होतो, एकल स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. समाजात एकल स्त्री म्हणून जगत असताना त्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात अनेक अडचणींना सामोऱ्या जात आहेत. समाजात अनेक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग दिसत आहे. शिक्षणामुळे स्त्रियांची प्रगती होत आहे. मात्र दुसरीकडे स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात एकल स्त्रियांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशातील एकल स्त्रियांचे प्रमाण ५१.२ दशलक्ष म्हणजे ५ कोटी १२ लाख इतके होते तर २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ती वाढून ७ कोटी १४ लाख इतकी झाली आहे. वयोगटानुसार हे प्रमाण पाहिले तर २५-२९ या वयोगटातील एकल स्त्रियांचे प्रमाण १ कोटी ६९ लाख म्हणजे २३ टक्के इतके आहे. २००१च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार एकल स्त्रियांचे प्रमाण ६० टक्के इतके होते तर २०११ च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण ६८ टक्के इतके वाढले. यात २ कोटी ९२ लाख विधवा आहेत तर १ कोटी ३२ लाख अविवाहित स्त्रिया आहेत. या एकूण आकडेवारीतील ४ कोटी ४४ लाख म्हणजे ६२ टक्के एकल स्त्रिया ग्रामीण आहेत. तर ५८ टक्के शहरात राहणाऱ्या आहेत. २०११ च्या आकडेवारी नुसार भारतातील एकल स्त्रियांचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे

Updated : 24 Jun 2020 11:31 AM GMT
Next Story
Share it
Top