सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक जण दगावले. तसेच अन्य आजार असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणा कोरोना उपचारात गुंतल्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांना योग्य ती सुविधा मिळाली नाही. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात गर्भवती महिलांच्या मृत्यूचे प्रमाण तसेच जन्मत: अर्भक मृत असण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त गर्भवती महिलांना कोरोना काळात कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय? आरोग्य व्यवस्थेवर असलेला ताण, अनेक रुग्णालयात कोव्हिडचे रुग्ण असल्यामुळे गर्भवती महिलांच्या मनात संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. अशावेळी तपासणी आणि लसीकरणासाठी कसे जावे? यावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी केलेले मार्गदर्शन पाहा....