Home > हेल्थ > सेक्स फक्त रात्रीच करायचा असतो का? Why do people usually have sex at night / explained by Dr. Rahul Patil

सेक्स फक्त रात्रीच करायचा असतो का? Why do people usually have sex at night / explained by Dr. Rahul Patil

सतत या गोष्टीचा भडीमार केला आहे की, सेक्स हा फक्त रात्रीत झाला पाहिजे. सेक्स हा अंधारातच असला पाहिजे. तो स्त्रीनेच सुरू केला पाहिजे अशा संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आता पक्क्या झाल्या आहेत. खरं पाहिलं तर असं काहीही नाही...

सेक्स फक्त रात्रीच करायचा असतो का?  Why do people usually have sex at night / explained by Dr. Rahul Patil
X

सहसा सेक्स रात्रीच्या वेळी केला जातो. पण सेक्स फक्त रात्रीच करावा का? तो दिवसा करावासा वाटला तर नेमकं काय करावं? सेक्स करण्याची अशी कोणती ठराविक वेळ असते का? या सगळ्या प्रश्नांवर डॉक्टरांचं नक्की काय म्हणणं आहे तेच आपण आता पाहणार आहोत.

सेक्स याविषयावर आजही आपल्या इथं कानातल्या कानातच बोललं जातं. मनात अनेक शंका असतात मात्र याची उत्तरं आपल्याला कुठेच भेटत नाहीत. या शंका मनात घेऊनच अनेक लोक स्वतःला आयुष्यभर दोषी ठरवत राहतात. स्त्री-पुरुष दोघांमध्ये असणाऱ्या लैंगिक समस्यांवर उघडपणे बोललं पाहिजे. याच हेतूने आम्ही #MaxWoman च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्त्री आणि पुरुषांना येणाऱ्या लैंगिक समस्यांवर वाचा फोडत आहोत. कोल्हापूर येथील प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट राहुल पाटील हे या विविध समस्यांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अर्थात आजचा विषय आहे 'सेक्स करण्याची अशी कोणती ठराविक वेळ असते का?'

सेक्स फक्त रात्रीच करावा का?

सेक्स कधी केला पाहिजे याविषयी आपल्या इथं अनेक अंधश्रद्धा आहेत. या सगळ्यांमध्ये सेक्स हा अमुक वेळी केला पाहिजे, दिवसा सेक्स केलं तर असं होईल, रात्री सेक्स करणं किती चांगलं अशा अनेक गोष्टींबाबत काही ना काही गोष्टी वारंवार पसरत असतात. मात्र या पाठीमागचे सत्य काय आहे. सेक्स फक्त रात्रीच केला पाहिजे का? हाच प्रश्न आम्ही डॉक्टर राहुल पाटील यांना विचारला याविषयी ते सांगतात, दिवसा सेक्स केल्यानंतर काय होईल असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतो. नोकरी, व्यवसायामुळे आज स्त्री-पुरुष दोघेही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सेक्स करताना दिवस किंवा रात्र हा विषय न राहता तो आपल्या टायमिंग नुसार कधीही केला तरी चालतो. पण सेक्स करत असताना घरांमध्ये आपल्याला स्वतंत्र खोली आहे का? किंवा स्वतंत्र खोली नसेल तर घरात कोणी नसेल याची खात्री करून तुम्ही कधीही सेक्स करू शकता.

सेक्सबाबत आपल्या इथल्या प्रत्येकाच्या मनावर असं बिंबवलं गेलं आहे की, सेक्स ही गोष्ट रात्री अंधारातच केली पाहिजे. अनेक चित्रपटातून देखील असंच दाखवलं जाते. तर सेक्स हा नेहमी रात्रीच किंवा अंधारातच केला पाहिजे का? याबद्दल डॉ. राहुल पाटील यांना विचारलं असता ते सांगतात की, आपल्यावर सतत या गोष्टीचा भडीमार केला आहे की, सेक्स हा फक्त रात्रीत झाला पाहिजे. सेक्स हा अंधारातच असला पाहिजे. तो स्त्रीनेच सुरू केला पाहिजे अशा संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आता पक्क्या झाल्या आहेत. खरं पाहिलं तर असं काहीही नाही. चोवीस तासांमध्ये दोघांची कधी इच्छा होईल व दोघांचेही शरीर तयार असेल आणि महत्वाच म्हणजे खाजगी रूम असेल त्यावेळी सेक्स केला तर कोणतीच अडचण नाही. असा कोणताही नियम नाही की ठराविक दिवशीच आणि ठराविक वेळीच सेक्स केला पाहिजे.

सेक्स दिवसा का केला जात नाही?

खरतर सेक्स या विषयावर आपल्याइथं चकार शब्द सुद्धा बोलला जात नाही. मात्र याबद्दल अनेक प्रश्न मनामध्ये असतात. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिवसा सेक्स का केला जात नाही याविषयी डॉ. राहुल पाटील सांगतात, स्त्रिया उजेडात नग्न होण्यासाठी लाजतात आणि बऱ्याच वेळा पुरुष देखील नग्न होण्यासाठी लाजतात. किंवा दिवस पुरुषांना त्यांचे शरीर आकर्षक नसले तर याचा त्यांच्या मनात दबाव असतो. आपलं नग्न शरीर स्त्रीने पाहिलं तर ती काय म्हणेल? आशा गोष्टींमुळे अनेक वेळा स्त्री-पुरुष दोघेही उजेडात सेक्स करणं टाळण्याचा प्रयत्न करतात. तर असं न करता तुम्हाला ज्या वेळी फावला वेळ मिळतो मग तो सकाळ-दुपार-संध्याकाळ केव्हाही सेक्स केला तरीही चालतो. या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रायव्हेट जागा. कारण की प्रत्येकाला प्रायव्हेट रूम आहे असं नाही. अनेकांना जागेची अडचण असते त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये देखील अनेक अडचणी येतात.

या सगळ्या गोष्टींमुळे स्त्री पुरुषांची लैंगिक इच्छा दबली जाते का?

अनेक वेळा सेक्स करत असताना दोघांच्याही इच्छा पूर्ण होत नाही. यासाठीदेखील अनेक कारणं कारणीभूत आहेत त्यामध्ये जागेची कमतरता हे महत्त्वाचं कारण आहे. याविषयी डॉ. राहुल पाटील सांगतात, ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे मात्र जागाच नाही किंवा भरपूर जागा आहे मात्र वेळ नाही. या कारणांमुळे सगळ्या कारणांमुळे अनेक वेळा स्त्री पुरुषांची लैंगिक इच्छा दबली जाते. त्यामुळे स्त्री पुरुष दोघांमध्येही चंचलपणा वाढायला लागतो. जे लोक नाईट शिफ्ट मध्ये काम करतात किंवा ते एकमेकांपासून लांब राहतात त्यामुळे त्या दोघांना एकत्र येणं शक्य नसतं अशावेळी रात्रभर थकून आल्यानंतर किंवा दिवसभर प्रवास करून आल्यानंतर शारीरिक संबंध ठेवताना ते लवकर उरकण्याचा प्रयत्न होतो आणि त्यामुळे स्त्री पुरुष दोघांमध्येही चिडचिडेपणा वाढतो. सेक्स हा कधीही करु शकतात मात्र यामध्ये एक गोष्ट पाहिली पाहिजे ती म्हणजे त्या दोघांचीही इच्छा..

डॉ. राहूल पाटील यांच्याकडून आम्ही कधीही न बोलले गेलेले विषय तुमच्या पुढे घेऊन येत आहोत. तुम्हाला आमची हि #Sexeducation सीरिज कशी वाटते? किंवा तुम्हाला कोणत्या विषयाची अधिक माहिती हवी असेल तर ते आम्हाला नक्की सांगा...

Updated : 6 April 2022 5:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top