Home > हेल्थ > काय आहेत झिकाची लक्षणे आणि तो कोणासाठी धोकादायक आहे?

काय आहेत झिकाची लक्षणे आणि तो कोणासाठी धोकादायक आहे?

काय आहेत झिकाची लक्षणे आणि तो कोणासाठी धोकादायक आहे?

काय आहेत झिकाची लक्षणे आणि तो कोणासाठी धोकादायक आहे?
X

महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण मागील आठवड्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली. सध्या राज्यात कोरोना तसेच अनेक ठिकाणी आलेला महापूर ही संकटे असताना आता झिका हा नवीन विषाणू तोंड वरती काढतोय. तर हा झिका विषाणू काय आहे? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती आहेत? हे सर्व आपण पाहणार आहोत. तर झिका हा विषाणू डासांमुळे होतो. एडिज प्रजातीच्या डासांमुळे या रोगाची लागण होते. डेंग्यू आणि चिकनगुनिया सारखे आजार देखील याच प्रजातीच्या डासांमुळे होतात. ज्यावेळी एखादा डास झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीस चावतो त्यावेळी तो त्याचे रक्त पितो आणि त्यानंतर तो डास कुठल्याही दुसऱ्या व्यक्तींला चावल्या नंतर त्या व्यक्तीला देखील या विषाणूची लागण होते. या विषाणूंमुळे लहान मुलांच्या मेंदूवर देखील परिणाम होतो. त्याचबरोबर मायक्रोसेफॅली नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे होण्याची शक्यता असते.

झिका विषाणू नक्की काय आहे?

ज्याप्रकारे डास चावल्यानंतर डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होतात अगदी त्याच प्रमाणे एडीज प्रजातीचा डास चावल्यानंतर झिका हा आजार होतो. एखाद्या व्यक्तीस जेव्हा हा झिका प्रजातीचा डास चावतो व त्या व्यक्तीस या आजाराची लागण होते. त्यानंतर लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त जेव्हा एखादा डास पितो व तो दुसऱ्या व्यक्तीला जाऊन चावतो अश्याप्रकारे हा विषाणू पसरतो. अश्या प्रकारे याचे संक्रमण होते.

हा आजार कोणासाठी धोकादायक आहे?

हा आजार तसा जीवघेना नाही. योग्य औषध उपचारानंतर हा आजार बरा होऊ शकतो. परंतु ज्या महिला गरोदर आहेत त्या महिलांसाठी हा आजार धोकादायक आहे. अशा गरोदर महिलेस जर हा आजार झाला तर जन्मास येणारे अपत्य हे व्यंग येऊ शकते, जन्माच्या वेळी बाळाचे डोके हे लहान असू शकते किंवा जन्मनाऱ्या बाळामध्ये मायक्रोसेफॅली हा अतिशय दुर्मिळ आजार होऊ शकतो.

हा रोगाचा प्रसार कसा होऊ शकतो?

हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचे सर्वात प्रमुख कारण डास आहेत. त्या व्यतिरिक्त हा विषाणू लैंगिक संबंधांमधून देखील पसरू शकतो.

या रोगाची काही लक्षणे दिसतात का?

ज्यावेळी ह्या रोगाची लागण होते त्यावेळी बऱ्यापैकी रुग्णांना कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. तर काही रुग्णांना ताप येणे, अंग दुखणे, डोळे येणे, अंगावरती छोटे-छोटे पुरळ उठणे किंवा सांधे दुखणे अशी लक्षणे आढळतात. ही सर्व लक्षणे डास चावल्यानंतर साधारण एक आठवडा इतक्या कालावधीनंतर दिसू लागतात.

विषाणू वरती कुठलेही औषध उपचार किंवा विशिष्ट उपचार अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा विषाणू आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या परिसरातील डास उत्पत्तीची ठिकाणे नाहीशी केली पाहिजेत. आपल्या आसपासचा परिसर स्वछ ठेवला पाहिजे. आपल्या आसपास डास येणार नाहीत याची खवरदारी घेतली पाहिजे.

Updated : 5 Aug 2021 1:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top