Home > हेल्थ > डोळ्यांखाली Dark Circle येत आहेत? जाणून घ्या Dark Circle येण्यामागची तीन महत्वाची कारणं आणि उपाय...

डोळ्यांखाली Dark Circle येत आहेत? जाणून घ्या Dark Circle येण्यामागची तीन महत्वाची कारणं आणि उपाय...

डोळ्यांखाली Dark Circle येत आहेत? जाणून घ्या Dark Circle येण्यामागची तीन महत्वाची कारणं आणि उपाय...
X

डोळ्यांखाली असणारे Dark Circle आपल्या सौंदर्यात अडचणीचे ठरतात. इतकंच नाही तर डार्क सर्कल असणं हे आपल्या त्वचेचं आरोग्य ठीक नसण्याचे लक्षण आहे. खरंतर अनेक कारणांनी आपल्या त्वचेचं आरोग्य खालावत असतं. आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे डार्क सर्कल सारखे त्वचेचे आजारांची लागण आपल्याया लगेच होते. आजच्या या लेखात आपण डार्क सर्कलची(dark circles treatment) तीन कारणे जाणून घेणार आहोत, शिवाय प्रत्येक कारणाचे समाधानकारक उपाय देखील जाणून घेणार आहोत.

ही आहेत डोळ्यांखाली डार्क सर्कल येण्यामागची ३ कारणे :

1. पहिलं कारण : थकवा

जेव्हा अनेक आठवडे आपल्याल पुरेशी झोप मिळत नसेल, आपल्यावर कामाचा ताण वाढत असेल तर आपल्या डोळ्यांवर थकवा येऊ लागतो. ज्यामुळे पापण्यांना सुज आणि डोळ्यांखाली खड्डे तयार होऊ लागतात.

उपाय- रोज आरामदायी व्यायाम करा शिवाय दीर्घ श्वासोच्छवास करणं देखील परीणामकारक ठरू शकतं.

2. दूसरं कारण - एलर्जी

जर आपण गेल्या काही काळात नवा आय मेकअप केला असेल किंवा कोणता नवा मस्करा वापरत असाल तर हे देखील आपल्या डोळयांखाली डार्क सर्कल येण्यास कारणीभूत ठरू शकतात. मस्करा किंवा आय मेकअप मध्ये असलेली रसायनं डोळ्यात जाऊ शकतात. ज्यामुळे डोळ्यांमधून पाणी येणं, डोळे लाल होणं किंवा त्यांनी सूझ येणं, शिवाय डार्क सर्कल यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

उपाय- दोन ते तीन आठवडे आय मेकअप करणं किंवा मस्करा लावणं सोडून द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार दिवसातून तीन वेळा antihistamine आईड्रॉप चा वापर करा. तरी सुध्दा जर आपल्याला फरक पडत नसेल तर मग डॉक्टरांशी सल्लामसलत करा.

3. तीसरं कारण- अनुवंशिक

जर आपल्या कुटूंबियांच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील तर आपल्या देखील डोळ्यांखाली अनुवंशिकरीत्या डार्क सर्कल येण्याचा धोका असतो. अनुवंशिकरीत्या आपल्या त्वचेमध्ये हाइपरपिग्मेंटेशन होतं. ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा डार्क होऊ लागते.


उपाय- रात्री आय मॉईश्चरायजिंग क्रीमचा वापर करा.

टीप : या लेखात दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. सदर लेख केवळ माहितीपर हेतूने लिहीला आहे.

Updated : 1 Nov 2021 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top