Home > हेल्थ > म्युकर मायकोसिसने शिर्डीत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यु

म्युकर मायकोसिसने शिर्डीत सहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यु

महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीस या नव्या आजाराची भीषण परिस्थिती पाहायला मिळतेय. हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या 6 महिन्याच्या मुलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डी येथे राहणाऱ्या कोरके यांच्या कुटुंबातील सहा महिन्याच्या श्रद्धा कोरके या मुलीला कोरोनाची लक्षणे असल्याने तिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू होते.

मात्र उपचाराअंती चिमुरडीने कोरोनावर मात केली. त्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला होता. पण म्युकरमायकोसीसची लक्षणे दिसून आली. यानंतर तिच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले. दरम्यान १३ तारखेला तिला लोणी येथील प्रवरा हाॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Updated : 15 Jun 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top