Corona Vaccine वर शंका व्यक्त केली म्हणून या राष्ट्रपतींनी टोचली मुलीलाच लस
X
इतर देशांनी रशियातल्या कोरोना लसीवर शंका व्यक्त केली म्हणून रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी त्यांच्या मुलीला कोरोनाची लस दिली आहे. त्यामुळे स्वतःच्या मुलीला लस टोचून पुतीन यांनी त्या देशांना आणि रशियातल्या जनतेलाही लस सुरक्षित असल्याचा संदेश दिला. उद्या रशियात कोरोनाच्या लसीची नोंदणी होत आहे. त्यानंतर लसीचं उत्पादन सुरु होऊन ऑक्टोबर महिन्यापासून लोकांना लस दिली जाणार आहे.
रशियाने ‘कोरोना’वर पहिली लस शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोविड-19’वरील लसीची नोंदणी करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यासंदर्भात घोषणा केली. त्यानंतर याबाबत जगभरातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकीकडे पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या कोरोना लसीवर शंका व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, रशियाकडे अनेक देशांनी कोरोनावरील लसीची मागणी केली आहे.