Home > हेल्थ > जरा डॉक्टरांना पण सांगा ‘हमें बिमारीसें लढना है, बिमार सें नही’….

जरा डॉक्टरांना पण सांगा ‘हमें बिमारीसें लढना है, बिमार सें नही’….

जरा डॉक्टरांना पण सांगा ‘हमें बिमारीसें लढना है, बिमार सें नही’….
X

कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा कोणताही अधीकृत अहवाल प्राप्त झालेला नसतानाही डॉक्टरने एका सिझर झालेल्या ओल्या बाळंतिणीला रुग्णालयाबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा कोणत्या खासगी रुग्णाणलातील डॉक्टरचा प्रताप नसुन चक्क हिंगोलीच्या समत येथील शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार आहे.

वसमत शहरातील पठान मोहल्ला भागातील महिला 22 जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सिझेरीयन करत प्रसुतीनंतर तिला मुलगी झाली. कुटुंबीय आंनदात होते. मात्र अचानक सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालयात धडकले. यानंतर पाच दिवसाच्या ओल्या बाळंतीणीला चक्क एका टॅक्सी ऑटोमध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालयात पाठऊन दिले.

सदर प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.

या समंधी स्री रूग्णालयाच्या अधिक्षकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘त्या महिलेला आम्ही रिक्षाने पाठवलेलं नाही. आमच्याकडील दोन्ही चालक क्वारंटाईन असल्याने रूग्णवाहिका यायला विलंब झाला. परंतु विलंबाने का होईना सदर पॉझिटिव्ह महिलेला रूग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, असे स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान प्रशासनाकडून त्या रिक्षाचालकाचा शोध घेणे सुरू आहे. तसेच सदर महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोरोनाचा द्वेष करण्यापेक्षा आजारी लोकांचाच द्वेष करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय रुग्णालय प्रशासनाची बेपरवाई सुद्धा दिसून येत आहे.

https://youtu.be/mwsD9n09Mg4

Updated : 28 July 2020 12:22 AM GMT
Next Story
Share it
Top