Home > हेल्थ > देशभरात 24 तासात कोरोनाचे 6 हजार 556 नवीन रुग्ण

देशभरात 24 तासात कोरोनाचे 6 हजार 556 नवीन रुग्ण

देशभरात 24 तासात कोरोनाचे 6 हजार 556 नवीन रुग्ण
X

देशभरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 556 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 1 लाख 58 हजार 333वर पोहोचली आहे.

पण दिलासादायक बाब म्हणजे या एकूण रुग्णांपैकी 67 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 86 हजार 110 आहे.

देशात सध्या सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 57 हजारांच्या जवळ आहे. तर त्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या तामिळनाडू – 18 हजार 545, दिल्ली-15 हजार 257, गुजरात – 15 हजार 195 अशी आहे.

Updated : 28 May 2020 10:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top