Home > हेल्थ > 'जिका'च्या रुग्णाबाबत काळजी करण्याची गरज नाही: राजेश टोपे

'जिका'च्या रुग्णाबाबत काळजी करण्याची गरज नाही: राजेश टोपे

जिकाच्या रुग्णाबाबत काळजी करण्याची गरज नाही: राजेश टोपे
X

पुणे जिल्हयातील पुरंदर तालुक्यात 'जिका'चा रुग्ण आढलुन आला आहे. याबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हंटले आहे. या आजाराच्या रुग्णामध्ये जी लक्षणं आढळून आली आहे त्यानुसार उपचार केले जात आहे. पुरंदर तालुक्यात साठलेल्या गोड पाण्यावर ईडीस डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून आवश्यक पाऊल उचलून सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिलीय.

देशासह राज्यावर कोरोनाचे (Corona virus) मोठे संकट असतानाच, राज्यात जिका व्हायरसचा (zika virus) पहिला रुग्ण आढळला आहे. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावामध्ये जिका व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय महिलेला जिका व्हायरसची लागण झाली आहे. सध्या या महिलेचे प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

Updated : 1 Aug 2021 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top