Home > हेल्थ > तिसरी लाट आली? केरळमध्ये 24 तासांत 23 हजारांपेक्षा अधिक रुग्ण

तिसरी लाट आली? केरळमध्ये 24 तासांत 23 हजारांपेक्षा अधिक रुग्ण

तिसरी लाट आली? केरळमध्ये 24 तासांत 23 हजारांपेक्षा अधिक रुग्ण
X

केरळमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस आणखीनच वाढताना पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 23,676 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर संक्रमित लोकांची संख्या वाढून34.49 लाख झाली आहे. तर गेल्या 24 तासात झालेल्या 148 जणांच्या मृत्यनंतर मृतांचा आकडा 17,103 वर पोहोचला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

सलग सहा दिवस 20,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी राज्यात 13,984 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर गेल्या 24 तासांत 1,99,456 लोकांची चाचणी करण्यात आली आणि संक्रमणाचा दर 11.87 टक्के राहिला. आतापर्यंत एकूण 2.77 कोटी चाचण्या करण्यात आल्या. तर या नवीन रुग्णांमध्ये 114 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 4,66,154 लोक निरीक्षणाखाली आहेत.

केरळमधील रुग्णांची वाढती संख्या धडकी भरणारी तर आहेच पण देशाची चिंता वाढवणारी सुद्धा आहे. देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना केरळमधील वाढती आकडेवारी तिसऱ्या लाटेचे संकेत तर नसेल ना? अशी चर्चा आता सर्वसामन्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

Updated : 4 Aug 2021 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top