Home > हेल्थ > रोज साडेसात तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती होते कमी...

रोज साडेसात तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती होते कमी...

रोज साडेसात तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती होते कमी...
X

आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झोप घेणे हे दोन्ही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. आशा लोकांमध्ये विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते असा वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी त्यांच्या संशोधनात दावा केला आहे. संशोधक आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. ब्रेंडन लुसी सांगतात, अपूर्ण झोप किंवा नीट झोप न लागल्यामुळे त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. मेंदूवरील हा परिणाम तुमच्या विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर दिसून येतो. एखाद्या व्यक्तीला सरासरी किती तास झोप घ्यावी आणि झोप न आल्यास काय करावे पाहूयात...

रोज किमान 7.30 तास झोपणं सर्वोत्तम आहे

संशोधकांनी म्हंटले आहे की, जर तुम्ही 8 तास झोप घेत असाल किंवा किमान 7:30 तासांची तुम्ही झोप घेत असला तर त्याचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. अल्झायमर सारख्या रोगाचा धोका कमी होतो.

संशोधनातून काय समोर आलं आहे?

सरासरी 75 वर्षे वय असलेल्या 100 वृद्धांवर संशोधन केले. यासाठी त्यांच्या कपाळावर एक छोटा मॉनिटर बांधण्यात आला होता. झोपेच्या वेळी मेंदूच्या क्रियाकलापाचा प्रकार मॉनिटरद्वारे तपासला गेला. सरासरी साडेचार वर्षे चाललेल्या या संशोधनात मेंदूच्या क्रियाकलापांवर परिणाम होत असल्याचे समोर आले. अल्झायमर रोगासाठी विशेष प्रकारचे प्रथिने जबाबदार असतात. संशोधनात सहभागी असलेल्या वृद्धांच्या मेंदूतील सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये त्या प्रोटीनची पातळी काय असते याचा शोध घेण्यात आला. दररोज रात्री सुमारे 7.5 तास झोपलेल्या रुग्णांचे संज्ञानात्मक गुण चांगले होते. त्याच वेळी, जे लोक दररोज 5 किंवा साडेपाच तास झोपतात त्यांना हा गुण कमी मिळाला.

झोपेचा अल्झायमरशी थेट संबंध

अर्धवट झोपेचा अल्झायमर आजाराशी संबंध असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून समोर आले आहे. अल्झायमरच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, गोंधळ होणे आणि नवीन गोष्टी समजण्यास उशीर होणे यांचा समावेश होतो. त्या टाळायच्या असतील तर किमान साडेसात तासांची झोप घेतली पाहिजे.

पण रात्री तुम्हाला झोपच येत नसेल तर...

चिनी शास्त्रज्ञांच्या ताज्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की कोमट दूध प्यायल्याने चांगली झोप लागते. चीनच्या नॅशनल नॅचरल सायन्स फाऊंडेशनच्या संशोधनात असे समोर आले आहे की दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते. या व्यतिरिक्त संशोधनातून असेही समोर आले आहे की दुधात पेप्टाइड केसिन हायड्रोलायझेट देखील आढळते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि झोप सुधारते. या दोन गोष्टी मिळून निद्रानाशाची समस्या दूर होते.

ही सर्व माहिती या संशोधनावर आधारित आहे.

Updated : 14 Nov 2021 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top